सोलापूर: दक्षिण सोलापुरातील वळसंग येथील शंकरलिंग हायस्कूलमधील शिक्षक सुरेश सिद्राया परशेट्टी (वय 56, रा. बेन्नूरनगर, विजापूर रोड सोलापूर) यांचा शनिवारी दुपारी आकस्मिक मृत्यू झाला आहे.
परशेट्टी शनिवारी भर दुपारी उन्हात दुचाकीवर घरी आले. पाणी पिल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काही कळण्याअगोदरच ते जमिनीवर कोसळले. रुग्णालयात दाखल केल्यावर उपचारापूर्वीच ते मरण पावल्याचे सांगण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे खरे कारण समजणार आहे.परशेट्टी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. ते मुळचे केगाव बु. तालुका अक्कलकोट येथील रहिवासी आहेत. त्यांची अंत्ययात्रा उद्या रविवारी दुपारी 12 वाजता नवीन आरटीओ ऑफिसजवळील बेन्नूरनगर येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. अंत्यविधी तुळजापूर वेस येथील लिंगायत स्मशानभूमीत होणार आहे.

More Stories
आरोग्य विभागातील कंत्राटी कायम झाले मग आमच्यावरच अन्याय का? झेडपी स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचा सवाल
अक्कलकोटमध्ये भर पावसात शाळांची न्यायाधीशांकडून तपासणी; निकृष्ट पोषण आहार नष्ट करण्याचे आदेश
पंढरीच्या स्वच्छता मोहिमेत झेडपीचे 250 कर्मचारी