सोलापूरक्राईमशिक्षण

लाचखोर वेतन अधीक्षक बालवाड, ग्रंथपाल बारबोले या दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी

सोलापूर: पीएफ खात्यातील रक्कम काढून देण्याच्या कामासाठी सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडलेल्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथकाचे अधीक्षक वालवड व ग्रंथपाल बारबोले या दोघांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायालयाने दिला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवार दिनांक 18 जून रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या दरम्यान सोलापूर येथील वेतन पथक कार्यालय परिसरात करण्यात आली. एका सहशिक्षकाला पीएफ फंडातून पाच लाख रुपये काढावयाचे होते. या प्रकरणात लक्ष्मण दत्तात्रय बालवाड (वय ५५), पद – अधीक्षक, वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालय, सोलापूर (वर्ग-2), सध्या रा. मंगल रेसिडेन्सी, होडगी रोड, सोलापूर, मूळ रा. वायगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर; अण्णासाहेब दगडू मेटकरी (वय अंदाजे ४८), पद – वरिष्ठ लिपिक, वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालय, सोलापूर (वर्ग-३), रा. कडलास, ता. सांगोला, जि. सोलापूर; तसेच विक्रम हरिश्चंद्र बारबोले (वय ५५), पद – ग्रंथपाल, श्रीमती रामबाई बाबूलाल सुराणा विद्यालय, चिकलठाण, ता. करमाळा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यातील अधीक्षक बालवाड आणि लिपिक बारबोले यांना लाचलुचवत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पैसे घेताना रंगेहात पकडले होते. तिघांच्या संमतीने बारबोले हा पैसे घेत होता.तक्रारदाराचे भविष्य निर्वाह निधीतील पैसे काढून देण्यासाठी आरोपींनी सहा हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी 15 जून रोजी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार सापळा लावून आरोपींना वेतन पथकाच्या कार्यालयाच्या खालील कार्यालयात गुरुवारी लाचेची रक्कम स्वीकारताना आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. अधीक्षक बालवाड व लिपिक बारबोले या दोघांना पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button