सोलापूरजिल्हाधिकारी कार्यालय

तुम्ही ‘हे” न केल्यास रेशनकार्ड पडू शकते बंद

सोलापूर: रेशनकार्डवरील धान्य सुरू राहण्यासाठी तुम्हाला काळजी घेणे गरजेचे आहे  अन्यथा तुमचे धान्य बंद होऊ शकते.  त्यामुळे शासनाने आता प्रत्येक ठिकाणी केवायसी करण्याचे काम सुरू केले आहे.

ई केवायसी का करावे?
आपले रेशन कार्ड व त्यावरील सर्व माहिती अपडेट असणे अनिवार्य आहे.ज्या प्रमाणे बँकेत आपले खाते चालू ठेवण्यासाठी ekyc केले जाते, त्याचप्रमाणे आपण एकप्रकारे हयात असल्याचे ऑनलाईन दाखला देण्यासारखं आहे.

ई केवायसी कसे करावे?
आपल्या रेशन नमूद कुटूंबातील सर्व सदस्यांचे आधार व कुटूंबातील सर्वजण रेशन दुकानात जाऊन दुकानदाराने पॉस मशीन वर आपली माहिती भरल्यानंतर आपला अंगठा लावून ekyc झाल्याचे खात्री दुकानदाराकडून करून घेणे.

ई केवायसी न केल्याचे नुकसान…

आपण जर प्रत्येक महिन्याला रेशन दुकानातून धान्य घेत असाल आणि त्याचे ऑनलाईन ekyc न केल्यास आपले आधार माहिती अपडेट नसल्याने आपण धान्या पासून वंचीत राहून धान्य बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ई केवायसी केल्याचा फायदा…

शासनाच्या अनेक योजनेत आपल्याला लागणारे कागदपत्रे हे ekyc मुळे अपडेट असणार आहेत.ह्यामुळे आपले धान्य बंद पडणार नाही.

शेळगीत केली सुरुवात…

अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर कार्यालय व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संयुक्त विद्यमानाने अन्नसुरक्षा व अंतोदय धान्याचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारका करिता ekyc शिबिराचे आयोजन शेळगी येथील हनुमान मंदिर येथे पार पाडण्यात आला. त्यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, माजी नगरसेवक किरण देशमुख, अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पाडोळे, परिमंडळ अधिकारी नितीन वाघ राजेश यमपुरे,सुयोग देशमुख, जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर तसेच जिल्हा संपर्कप्रमुख नितीन पेंटर, बसवराज बिराजदार उपस्थित होते. यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी नागरिकांना शासन आपल्या दारी ह्या माध्यमातून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा जेणेकरून धान्यावेळेस होणार्‍या गर्दीत गैरसोय टाळता येईल असे आवाहन केले.अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या  ekyc शिबिरास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button