सोलापूर सोलापूर नव्हे तर देशभरात दिवाळी शनिवारी मध्यरात्री साजरी झाली. निमित्त होते क्रिकेट जगतात भारत विश्व विजेता झाल्याचे.
टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताने सात धावांनी साउथ आफ्रिकेवर विजय मिळवला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात साउथ आफ्रिकेने चांगली पकड मिळवली होती पण भारताचा गोलंदाज बुमरा याने सामना फिरवला. शेवटच्या दोन ओव्हर मध्ये अत्यंत चुरस निर्माण झाली होती. भारताच्या संघाने शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच फिरवली आणि विश्वविजेता होण्याचा मान मिळवला. हा सामना जिंकल्यावर भारतीय क्रिकेट टीम मधील सर्व खेळाडू भावनिक झाल्याचे पहावयास मिळाले. याचा आनंद समस्त भारतीयांना झाला देशभरात नागरिकांनी फटाके फोडून दिवाळी साजरी केली. सोलापुरात ही क्रिकेट प्रेमींनी फटाके फोडून हा आनंद साजरा केला.

More Stories
मंगळवेढा न्यायालयाने विनयभंगाच्या गुन्ह्यात सुनावली आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी
सोलापुरात हिरकणी बसची ट्रकला धडक चालकासह महिला प्रवासी ठार
माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी जागेवर दिली डिजिटल अनुकंपा नियुक्ती