सोलापूरकृषीनिवडणूक

सोलापूर बाजार समिती सभापतीची निवड “या’ दिवशी होणार

सभापती, उपसभापती कोण होणार? याकडे लागले जिल्ह्याचे लक्ष

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने व माजी संचालक सुरेश हसापुरे यांच्या गटाला बहुमत मिळाले आहे. आता बाजार समितीचे सभापती व उपसभापती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संचालक मंडळाच्या निवडीनंतर जल्लोष करताना माजी आमदार दिलीप माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली त्यामुळे सभापती कोण होणार हे मुख्यमंत्री फडणवीसच ठरवणार असे जाहीर केले आहे. सभापतीचे नाव निश्चित करण्यासाठी अद्याप फडणवीस यांची भेट झालेली नसल्याचे सांगण्यात आले आहे. येत्या दोन दिवसात यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सूत्राने सांगितले. दरम्यान बाजार समितीचे सचिव यांनी सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केला असून 11 मे रोजी चाकोते सभागृहात यासाठी विशेष सभा बोलवण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button