सोलापूरक्रीडासंघटना-संस्था

सोलापुरात राष्ट्रवादीच्या ‘या” नेत्याने मारली किक

सोलापूर: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर व सोलापूर शहर व जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तर शालेय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते महेशजी गादेकर यांनी फुटबॉल ला किक मारून केले.

प्रारंभी हिराचंद नेमचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सत्यजित शहा यांच्याहस्ते मैदानाचे पूजन श्रीफळ वाढवून करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, वालचंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. श्री संतोष कोटी, प्रा. संभाजी चव्हाण, प्रा. राहुल हजारे, पंचप्रमुख किरण दुस्तकर आदी उपस्थित होते.

15 वर्षाखालील मुलांचा अंतिम सामना बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शूटआउट मध्ये सिंहगड पब्लिक स्कूल, केगाव संघाने ग्रीन फिंगर्स स्कूल, अकलूज संघाचा 4-3 अशा 1 गुणाने मात करीत विजेतेपद पटकाविले. सिंहगड संघाकडून खेळताना वीरांश वर्मा, नैतिक मंत्री पुष्कराज क्षीरसागर सिद्धार्थ जाधव याने प्रत्येकी एक गोल नोंदविला.

17 वर्षाखालील मुलांचा अंतिम सामना बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शूटआउट मध्ये महाराष्ट्र विद्यालय बार्शी संघाने सिंहगड पब्लिक स्कूल केगाव संघाचा 4-3 अशा 1 गुणाने मात करत विजेतेपद पटकाविले. महाराष्ट्र विद्यालय बार्शी संघाकडून खेळताना प्रथमेश आवारी, अथर्व कुलकर्णी, प्रणव आमडे ,अथर्व गायकवाड यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. 17 वर्षाखालील मुलीचाअंतिम सामना विकास विद्यालय अजनाळे तालुका सांगोला विरुद्ध एमआयटी केगावविरुद्ध विकास विद्यालय अजनाळे संघाने एकतर्फी 7 – 0 असे गुणाने विजेतेपद पटकाविले. मुलींच्या अंतिम सामन्यांमध्ये अजनाळे स्कूलच्या धनश्री पाटील हिने तीन गोल नोंदविले व प्रतीक्षा जावळे ,केतकी कोंडस्कर, अनुष्का लोखंडे,मुगंधरा पाटील यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button