सोलापूरजिल्हा परिषदसंघटना-संस्था

सोलापूर झेडपीत म.बसवेश्वर जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी

93 कर्मचाऱ्यांनी करून घेतल्या विविध तपासण्या

सोलापूर : जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त वीरशैव लिंगायत अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी मंडळाच्यावतीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सभागृहात जिल्हा परिषदेमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली यात 93 कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवत आपली आरोग्य तपासणी करून घेतली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जगञ्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, उपमुख्य लेखा वित्त अधिकारी चंद्रकांत पाटील उपस्थित होते.या कार्यक्रमामध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचे चरित्र पुस्तक सर्व अधिकारी व कर्मचारी यांना वाटप करण्यात आले. तसेच डीएचओ डॉ. संतोष नवले, टीएचओ डॉ. निलम घोगरे,  डॉ. अश्विन करजखेडे यांच्या वैद्यकीय पथकाने 93 अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी केली. यावेळी जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जीवन चरित्र्यावर डॉ. राजशेखर सोलापूरे व संजय पाटील यांचे व्याख्यान झाले.

या कार्यक्रमास शिवानंद मगे, बसवराज दिंडोरे, अनिल बिराजदार, विकास गुळमिरे, संजय गौडगाव, श्रीशैल देशमुख, मेघराज कोरे, शशिकला म्हेत्रे, जगदिश कुलकर्णी, शिवानंद म्हमाणे, दिनेश बनसोडे, मंजुनाथ चिंचोळे, शिवपुत्र कुमठे, सुर्यकांत तोडकरी, सचिन येडसे, अंकुश खेलबुडे, गुंडू कारंडे, योगेश हब्बु, गुरु रेवे, राम जेऊरे, अविनाश भरले, मल्लिकार्जुन मणूरे, बसवराज भेंडी, काशिनाथ बिराजदार, बसवराज बिराजदार, राजु राठोड, दयानंद अगरखेड, महेश भोरे, सिद्रामप्पा लोकापूरे, महेश सुतार, शंकर कोळी, राकेश सोडडे, संजय कुंभार, इरण्णा भरडे, रेवण म्हेत्रे, रेवण बोरगाव, महेश शेंडे, गणेश हुच्चे, अविनाश गोडसे, डॉ. एस. पी. माने, तजमुल मुत्तवली, संतोष शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेश कोटीवाले यांनी केले तर संजय पाटील यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button