क्राईमजिल्हा परिषदसोलापूर

माळशिरस पंचायत समितीतील वरिष्ठ सहाय्यक नागटिळक जाळ्यात

तक्रारदार कंत्राट दाराने माळशिरस पंचायत समितीअंतर्गत सभामडपाचे काम केले होते. या कामाचे बिल काढण्यासाठी आरोपीकडून काम पूर्णत्वाचा दाखला हवा होता. या कामासाठी नागटिळक याने दहा हजार लाचेची मागणी केली. कंत्राटदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांच्याकडे तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता, नागटिळक यांनी १० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आणि तडजोडीअंती ५ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माळशिरस येथे सापळा रचला. ठरल्याप्रमाणे ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सुंदरराव नागटिळक याला पथकाने रंगेहात पकडले.

याप्रकरणी सुंदरराव उत्तम नागटिळक (वय ५६ वर्षे, पद – वरिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती,माळशिरस, रा. टाकळीरोड, पंढरपूर ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया माळशिरस पोलीस ठाण्यात सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button