सोलापूरकलाजिल्हा परिषद

माळशिरस, कुर्डूवाडी पंचायत समितीची टीम ठरली सरस

क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे झेडपीतर्फे उत्कृष्ट नियोजन

सोलापूर : जिल्हा परिषद आयोजित पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी विविध गुणदर्शन सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत माळशिरस व कुर्डूवाडी पंचायत समिती सरस ठरली. विजेत्यांना पारितोषिक वितरण समारंभ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

पारितोषिक वितरणप्रसंगी क्रीडा व सांस्कृतिक नियोजन समितीच्या सचिवा तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे, खाते प्रमुख प्रसाद मिरकले, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे,संतोष कुलकर्णी,पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक अमोल जाधव सहसचिव अनिल,जगताप, संजय सावंत, सदस्य चद्रकांत होळकर, विवेक लिंगराज,अविनाश गोडसे, सचिन साळुंखे व नागेश धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सांस्कृतिक स्पर्धा प्रकारात कथाकथन,स्वराचित कविता, वैयक्तिक नृत्य, एकपात्री स्पर्धा प्रकारांचा समावेश आहे .या स्पर्धा प्रकाराव्यतिरिक्त विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एक तासाचा राखीव वेळ ठेवण्यात आलेला होता. मुख्यालय व जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीने वेगवेगळ्या कलाविष्कार सादर केले. जिल्ह्यातून पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी यांचा सांस्कृतिक स्पर्धेला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे…

1) कथाकथन

*प्रथम क्रमांक*

कुर्डवाडी;- संतोष जाधव

*द्वितीय क्रमांक*

बार्शी :-उर्मिला माने

*तृतीय क्रमांक*

पंढरपूर:- शहाजी देशमुख

2) *स्वरचित कविता*

*प्रथम क्रमांक*

माळशिरस:-प्रकाश काळे

*द्वितीय क्रमांक*

कुर्डूवाडी:-ज्योतिबा जाधव

*तृतीय क्रमांक*

अक्कलकोट:-अश्विनी हिटनळी

*3) गीत गायन* वैयक्तिक

*प्रथम क्रमांक*

कुर्डूवाडी:-किरण शेलार

*द्वितीय क्रमांक*

*अक्कलकोट* महेश मेत्रे

*तृतीय क्रमांक*

बार्शी:- दत्तात्रय अंकुश

4) एकपात्री नाटक* *वैयक्तिक* प्रथम क्रमांक मोहोळ :-प्रदीप गुंड

*द्वितीय क्रमांक* कुर्डूवाडी :-अर्चना शिंदे

*तृतीय क्रमांक* माळशिरस:- अश्फाक मुलांनी

5)नृत्य वैयक्तिक*

*प्रथम क्रमांक* माळशिरस: नाजनीन शेख

*द्वितीय क्रमांक* मोहोळ:- अलका भालेकर

*तृतीय क्रमांक* उत्तर सोलापूर:- दुर्गादेवी उरट

 

सांघिक स्पर्धा प्रकार

6) *समूहगीत*

प्रथम क्रमांक:- कुर्डूवाडी

देशभक्तीपर गीत

 

*द्वितीय क्रमांक* मोहोळ

देशभक्तीपर गीत

*लघुनाटिका*

*प्रथम क्रमांक*

माळशिरस:- विनोदी प्रहसन

*द्वितीय क्रमांक*

अक्कलकोट:- एकत्र कुटुंब मस्त

*लोकनृत्य*

प्रथम क्रमांक:- दक्षिण सोलापूर, बियरल आसामी

द्वितीय क्रमांक:- उत्तर सोलापूर, आईगिरी नंदिनी

या सांस्कृतिक स्पर्धेचे प्रास्ताविक सांस्कृतिक समिती प्रमुख प्रसाद मिरकले यांनी केले. यावेळी क्रीडा व सांस्कृतिक नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य सुमित फुलमामडी, प्रशांत बडवे, गोवर्धन कमटम, परीक्षक प्रतिनिधी सुनंदा शेंडगे यांचा यावेळी सांस्कृतिक समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. या विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मल्लिकार्जुन सोमेश्वर, सचिन जाधव, माधुरी भोसले, गणेश कुडले, नरेंद्र अकेले,मिलन बिराजदार, विशाल घोगरे यांनी विशेष प्रयत्न केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रशासनाधिकारी विवेक लिंगराज यांनी केले तर आभार प्रदर्शन चंद्रकांत होळकर यांनी केले.

कर्मचारी झाले तणावमुक्त

क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमामुळे जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी तणावमुक्त झाले. कोरोना महामारीनंतर बऱ्याच काळानंतर असा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या संयोजनाबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांचे कर्मचाऱ्यांनी आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button