सोलापूर

सीईओ मनीषा आव्हाळे यांनी तपासले रस्त्याचे मोजमाप

मंगळवेढा तालुक्यात अंगणवाडीतील पटसंख्या वाढविण्याची सूचना

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी बुधवारी मंगळवेढा तालुक्यात अचानक भेटी देऊन रस्त्यांची कामे, अंगणवाडी व आमदार निधीतील कामांची पाहणी केली. यावेळी आव्हाळे यांनी चक्क रस्त्यांचे मोजमापे घेऊन खातरजमा केली.

सीईओ आव्हाळे या बुधवारी सांगोला तालुक्यात भेट देऊन परतत असताना मंगळवेढा तालुक्यातील आमदार समाधान आवताडे यांच्या मतदारसंघातील कामांची तपासणी करून समाधान व्यक्त केले.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी ग्रामीण विकासाची गंगोत्री असणा-या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडील तसेच तालुक्यातील विकास कामांची पाहणी व तपासणी करण्याची मोहीम घेतली आहे. मंगळवेढा येथील कामांची पाहणी व तपासणी करुन आपण फक्त कार्यालयीन कामकाजच करीत नसून क्षेत्रीय कामात पण लक्ष घालून विकास कामांचा दर्जा तपासणार आहोत व या पध्दतीने जिल्हा परिषद सोलापूरची उत्कृष्ट कामांची धुरा समर्थपणे दुर्गेच्या स्वरुपात सांभाळू याची ग्वाही त्यांनी बुधवारी दिली. आमदार समाधान आवताडे यांच्या मंगळवेढा तालुक्यात सुचीत केलेल्या जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील लेखाशिर्ष ३०५४ २०८१ ग्रामीण रस्ते विकास व मजबूतीकरण करणे या योजनेतील भाळवणी ते जिंत्ती या रस्त्याची समक्ष पाहणी करुन आवश्यकतेनुसार कामांची मोजमापे घेवून कामाची तपासणी केली. या रस्त्याचे ५१० मीटरचे काम सध्या पूर्णत्वाकडे आलेले असून या कामातील बाजूपट्टयांचे काम फक्त बाकी आहे. कामाचा दर्जाची त्यांनी स्वतः पडताळणी केली. कामातील तांत्रीक बाबींबाबत प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणीच्या वेळी उपस्थित कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांच्याशी चर्चा करुन शंकांचे निरसन करुन घेतले. यानंतर या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. या रस्त्याच्या कामासोबतच ग्रामीण भागातील लहान मुलांना व मातांना आधार केंद्र असे श्री संत चोखामेळानगरातील आंगणवाडीच्या इमारतीचे काम व अंगणवाडीचे कामकाज पाहून इमारतीच्या रंगसंगतीबाबत काही सूचना दिल्या. तसेच आंगणवाडीकरीता आवश्यक व लहान मुलांना आकर्षण किंवा आंगणवाडीची ओढ लागण्याच्या दृष्टीने गरजेच्या असणा-या वबाबी अन्य योजनेतून निधी उपलब्ध करुन कामे पूर्ण करुन घेण्याबाबत तसेच पोषण आहाराच्या बाबतही नाविन्यपूर्ण सुचना दिल्या. आंगणवाडीच्या मुलांच्या उपस्थितीबाबतही आंगणवाडी सेविका व अन्य कर्मचारी यांचेशी संवाद साधून पटसंख्या वाढविणेच्या सूचना दिल्या.

यांनंतर त्यांनी मंगळवेढा शहरालगतच्या श्री संत दामाजीनगर ग्रामपंचायतीने नागरी सुविधा योजनेमधून उभारलेल्या बगीच्याचे काम व आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत पूर्ण झालेले सभामंडपाच्या कामाची पाहणी केली. मंगळवेढा उपविभाग व पंचायत समितीकडील कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button