सोलापूरमहापालिकाराजकीय

सोलापुरातील सर्वात कमी वयाच्या उच्चशिक्षित नगरसेविका होण्याचा मान मृण्मयी गवळीला!

सोलापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ मधून निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या उच्चविद्याविभूषित नगरसेविका मृण्मयी महादेव गवळी हिने वयाच्या २५ व्या वर्षी सोलापूर महानगरपालिकेत सर्वात कमी वयाच्या नगरसेविका होण्याचा मान मिळविला आहे.

गवळी वस्ती तालीम संघाचे संस्थापक महादेव गवळी यांची मृण्मयी ही कन्या आहे. सोलापूर विद्यापीठामध्ये लेक्चरर आहे. भाषेवर वक्तृत्व आणि महिलांच्या प्रश्नांची जाण असलेल्या नगरसेविका म्हणून मृण्मयी गवळी या सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका म्हणून कामकाज पाहणार आहेत.

पूजा वाडेकर 23 वर्षीय

महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका पूजा श्रीकांत वाडेकर वयाच्या २३ व्या वर्षी सोलापूर महानगरपालिकेत सर्वात कमी वयाच्या नगरसेविका होण्याचा मान मिळविला आहे. पूजा श्रीकांत वाडेकर यांचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले असून, समाजकारण आणि राजकारण दोन्हीची सांगड घालून महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका म्हणून कामकाज पाहणार असल्याचे सांगण्यात आले. विक्रमी असे १४८२३ मते मिळवत माजी आमदार आडम मास्तर यांच्या कन्या अरुणा आडम माकपा ३५२६  यांचा दारुण पराभव केला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जास्तीत जास्त युवा मतदारांना या निवडणुकीत संधी दिली, पूजा श्रीकांत वाडेकर ह्यांनी प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणूक लढवली. आणि संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे पॅनल विजयी झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button