सोलापूरकृषीधार्मिक पर्यटन

मंद्रूपच्या कृषी प्रदर्शनाला ४० हजार शेतकऱ्यांनी दिली भेट

मंद्रूप :  श्री मळसिध्द यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाला चार दिवसांत तब्बल ४० हजारांहून अधिक शेतकरी, नागरिक,युवक आणि महिला वर्गांनी भेट देऊन आधुनिक कृषी अवजाराची खरेदी केली आहे.  या प्रदर्शनात सुमारे दोन कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे.

मंद्रूप येथे श्री मळसिध्द यात्रेनिमित्त दिनांक १३,१४, १५ आणि १६ जानेवारी असे चार दिवस  कृषी प्रदर्शना्चे आयोजन केले होते . उद्घाटन माजी आमदार राजन पाटील यांच्याहस्ते तर आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले होते.श्री मळसिध्द देवस्थान यात्रा कमिटीचे अध्यक्ष अँड राजेश देशमुख, श्री मळसिध्द देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष‌‌‌ हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हे प्रदर्शन संपन्न झाले.या प्रदर्शनाला दक्षिण सोलापूरसह सोलापूर जिल्हा, कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी बांधवांनी लाभ घेतला आहे.
या प्रदर्शनात विविध कंपनीचे ट्रॅक्टर, शेती मालवाहतूक ट्रक टेम्पो, शेतीपूरक विविध तांत्रिक औजारे, यंत्रसामग्री, दुचाकी आणि चारचाकी वाहने यासह विविध वस्तूची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे.
याप्रदर्शनात शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, औजारे, मशिनरी,बी-बियाणे,खते, औषधांची माहिती मिळाली.पिकांचे उत्पादन वाढीसाठी योग्य ते मार्गदर्शन मिळावे हा उद्देश होता. मंद्रूप येथे प्रथमच कृषी प्रदर्शन आयोजित केल्याने‌ शेतकरी आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.हे कृषी प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी श्री मळसिध्द देवस्थान यात्रा कमिटीचे अध्यक्ष अँड राजेश देशमुख, श्री मळसिध्द देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, पत्रकार पंचाक्षरी स्वामी‌, सुनील व्हनमाने, राधाकृष्ण गोसावी,बिळेणसिध्द सुंटे, तमण्णा पुजारी,बाबुशा देशमुख, अनिकेत पाटील,सिकंदर आवटे यांनी परिश्रम घेतले आहेत.

पुढील वर्षी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन
पत्रकार पंचाक्षरी स्वामी‌ यांच्या संकल्पनेतून यंदा प्रथमच मळसिध्द यात्रा कमिटीने जिल्हास्तरीय
कृषी प्रदर्शन आयोजित केले होते. पहिल्याच वर्षी या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे पुढील वर्षी आपण राज्यस्तरीय प्रदर्शन आयोजित करू, अशी ग्वाही मळसिध्द यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजेश देशमुख यांनी दिली..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button