सोलापूरजिल्हा परिषद

संदीप कोहिनकर यांच्याकडे झेडपी सीईओचा अतिरिक्त पदभार

सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम हे आपल्या खाजगी कामानिमित्त रजेवर गेल्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्याकडे त्यांचा पदभार देण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या वेळेस बुलढाण्याहून कुलदीप जंगम यांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर निवडणूक जाहीर झाल्यामुळे प्रक्रिया पार पडेपर्यंत जंगम यांना आपल्या मूळ गावी जाता आले नाही. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर घरगुती कामासाठी त्यांनी विभागीय आयुक्तांकडे दीर्घ रजेची मागणी केली. दोन डिसेंबर पासून त्यांची रजा मंजूर झाल्यामुळे त्यांचा पदभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्याकडे देण्याचा विभागीय आयुक्तांनी आदेश दिला आहे. त्यानुसार कोहिनकर यांनी  सोमवारी हा अतिरिक्त पदभार घेतला. 22 डिसेंबर पर्यंत सीईओ जंगम रजेवर असल्याचे सांगण्यात आले. दोन वर्षात कोहिणकर यांच्याकडे दोन वेळा अशी जबाबदारी आली आहे. तत्कालीन सीईओ दिलीप स्वामी प्रशिक्षणासाठी मसुरीला गेल्यावर कोहिनकर यांच्याकडे पदभार आला होता. अत्यंत कौशल्याने त्यांनी हा पदभार हाताळला आहे. महिनाखेर जिल्हा नियोजनची सभा होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने  सीईओ जंगम यांची तयारी असावी म्हणून कोहिनकर यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेऊन सर्व ती तयारी करण्याच्या सूचना दिल्या.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button