सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

शाळेच्या पहिल्या दिवशी झेडपीचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी वाटल्या 11 हजार वह्या

सोलापूर : जनतेच्या विश्वासाला न्याय देत आणि समाजहिताचा संकल्प जपत, जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर इंद्रजीत पवार यांनी सत्कारावेळी हार, पुष्पगुच्छ किंवा शाल स्वीकारण्याऐवजी शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य तसेच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त कृषी साहित्य देण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. त्यांच्या या प्रेरणादायी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यातून संकलित झालेल्या वह्या शाळेच्या पहिल्या दिवशी उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी विद्यार्थ्यांना वाटल्या.

या उपक्रमाच्या माध्यमातून ११ हजारांहून अधिक वह्या तसेच विविध प्रकारचे शेतीसाठी उपयुक्त साहित्य संकलित करण्यात आले. संकलित करण्यात आलेले सर्व शैक्षणिक साहित्य उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. यामध्ये मार्डी, कारंबा, नान्नज, बाणेगाव, बी. बी. दारफळ, भोगाव, अकोलेकाटी, एकरूग, तरटगाव, हिप्परगा, हगलूर, खेड आणि गुळवंची येथील शाळांचा समावेश आहे. यासाठी अमोल बोराडे, अझर शेख, विनायक सुतार, अमोल सुतार, संजय आदाटे, संभाजी दडे, संतोष गोसावी, प्रताप गवळी, पिंटू जाधव, केदार तोडकरी, नागेश ननवरे, वैभव पाटील, पिंटू कापसे, यतीन देडे, दीपक डोंगे, हर्षल शिरसागर, बाबुराव भोरे, होळकर, श्रीकांत पाटील, विनोद पाटील, सचिन भिंगारे, दादा भिंगारे, श्याम शिंदे, सोमनाथ काळे, सुनिल जाधव आणि सुहास भोसले यांनी परिश्रम घेतले.या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली असून, शिक्षण क्षेत्राला भक्कम आधार मिळाला आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी मार्डीतील जिल्हा परिषद शाळेतून त्यांनी या उपक्रमाची सुरुवात केली. शाळेतील मुलांचा उत्साह पाहून त्यांना हे आपले शाळेचे दिवस आठवले.

याचबरोबर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनीही शाळेच्या पहिल्या दिवशी कुसळंब येथील जिल्हा परिषद शाळेत हजर राहून नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे किती आव्हानात्मक आहे यावर त्यांनी भर दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button