सोलापूरजिल्हाधिकारी कार्यालय

सोलापुरात कलेक्टर कचेरीत शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळपासून आलो, कलेक्टरची भेट नाही.. कोण जबाबदार असा केला सवाल

सोलापूर : सकाळपासून आलो, कलेक्टर भेटत नाहीत, कोण ह्याला जबाबदार? असे म्हणत खिशातील कागदपत्र दाखवत सोलापूरमध्ये एका वृद्ध शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तडफडणाऱ्या शेतकऱ्याला पाहून उपस्थित असणाऱ्या लोकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. एका वृद्ध शेतकऱ्याने सुरक्षा रक्षकाच्या केबिन जवळच कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सोपान वासुदेव राऊत असं या विष प्राशन करणाऱ्या शेतकऱ्याचं नावं आहे. शेतीविषयक असलेल्या तक्रारीवरून अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरच सोपान राऊत यांनी विषारी द्रव्य प्राशन केलं. मागील अनेक दिवसांपासून सोपान राऊत हे आपली कैफियत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत होते. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे राऊत कार्यालयात आले पण त्यांना कोणीही जिल्हाधिकाऱ्यांना भेटू दिले नाही. त्यामुळे ते अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरच सुरक्षा रक्षकच्या केबिनजवळ  खाली बसले. त्यानंतर त्यांनी सोबत आणलेलं कीटकनाशक प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. तोंडातून फेस येऊ लागल्यावर ते ओरडू लागले. त्यामुळे बघ्यांची गर्दी जमली. त्यांची अवस्था पाहून उपस्थितानी पुढाकार घेत त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले. त्यानंतर मात्र प्रशासनाची धावपळ उडाली. त्या वृद्ध शेतकऱ्यांची ज्यांच्याविरुद्ध तक्रार होती त्यांच्यावर कारवाई करण्याचे उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button