सोलापूरजिल्हा परिषद

आता “या’ नव्या योजनेतूनही शेतकऱ्यांना विहीर मिळणार

सोलापूर : विकसित भारत रोजगार व उपजीविका हमी अभियान (ग्रामीण)’ची महत्वपुर्ण योजना आहे. या व्हीबी जी रामजी या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करा,
असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य यांनी केले. या नव्या योजनेतूनही शेतकऱ्यांना विहिरी घेता येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

भारत सरकारच्या ‘विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण)’ (VBRAG) अधिनियम-२०२५ ची राज्यात १ जुलैपासून अंमलबजावणी सुरू झाली असून, सोलापूर जिल्ह्यात या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ गुरुवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य यांचेहस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अंजली मरोड, गटविकास अधिकारी अरूण वाघमोडे, नायब तहसीलदार चंदे, जिल्हा परिषदेचे सदस्य अतुल पवार, प्रदिप खांडेकर, करूणा शिवशरण, चंद्रकांत जाधव, शिवाजी जाधव, सुषमा नारनवर, चैताली मुळे, उपसभापती सुनील भोसले, कृषी अधिकारी मुरलीधर राजे, सहा लेखाधिकारी बाबासाहेब माने  उपस्थित होते.

या अभियानामुळे ग्रामीण भागात स्थानिक रोजगारनिर्मिती, जलसंधारण, पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकासाला नवी चालना मिळणार आहे. या योजनेमुळे जिल्ह्यांच्या विकासास दिशा मिळणार आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा,.असे आवाहन अध्यक्ष दिपक वैद्य यांनी सांगितले.

तालुक्यांचा गौरव करणार: उपाध्यक्ष पवार
या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून उत्कृष्ठ काम करणारे तालुक्यांचा सन्मान करण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी सांगितले. योजनेचे अंमलबजावणी करताना रोजगार सेवकपासून ते जिल्हास्तरापर्यंत मन लावून योजना राबवा. जेणेकरून कोणीही घटक यापासून वंचित राहणार नाही. स्थानिक रोजगार व या योजनेतून मिळणारा रोजगार यांची तफावत असली तरी १२५ दिवसांचा किमान रोजगार हा मजुरांना आधार आहे, असेही उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी सांगितले. सभापती चेतनसिंह केदार यांनी जिल्ह्यात योजनेची अंमलबजावणी करताना अडचणी येतात. मात्र अडचणींवर मात करा. वस्तुस्थिती जाणून घ्या. काम बंद ठेवू नका. विहीर ही शेतकरी यांची जीवनदायिनी आहे. राज्यात सोलापूर जिल्हा अग्रेसर राहिल याची काळजी घ्या. गावाचा कायापालट करणेची क्षमता योजनेत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वकांक्षी योदना बनविली आहे. याची चांगली अंमलबजावणी करा. असे आवाहन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सूर्यकांत भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली अभियानाच्या अंमलबजावणीस सुरूवात करण्यात आली आहे.

प्रारंभी व्हीबीरामजी या योजनेचे फलकाचे उद्घाटन अध्यक्ष दिपक वैद्य यांचे हस्ते करणेत आले. तसेच
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करणेत आले.
या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्थलांतर रोखणे, गावपातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, जलसंधारण व जलसुरक्षा मजबूत करणे, ग्रामीण पायाभूत सुविधा उभारणे, उपजीविकेला चालना देणारी विकासकामे आणि आपत्ती प्रतिबंधक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाला मोठी गती मिळेल, जुनी सर्व विहिरीची कामे या योजनेत समाविष्ट आहेत त्यामुळे कुणी याबाबत गैरसमज करू नये असे उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांनी सांगितले.

कार्यक्रमात यशदाचे प्रविण प्रशिक्षक हणुमंत कादे यांनी सादरीकरणाद्वारे अभियानाची सविस्तर माहिती दिली. तर रोहयो योजनेतील यशोगाथांचे सादरीकरण जिल्हा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सुरवसे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जाधव यांनी केले, तर व्हीबी जीराम जी चे गटविकास अधिकारी अरुण वाघमोडे, यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सिध्दार्थ गायकवाड,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रणजित सुरवसे, प्रसन्न जाधव, अमोल महिंद्रकर यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button