सोलापूरजिल्हा परिषद

सोलापूर ‘माध्यमिक”मध्ये जगतापच्या नियुक्तीवरून असंतोष

सोलापूर : माध्यमिक शिक्षण विभागात प्रतिनियुक्तीवरून आलेले कक्ष अधिकारी अनिल जगताप यांच्या प्रतिनियुक्तीवरून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे तर दुसरीकडे नव्याने प्रतिनियुक्त करण्यात आलेल्या चार कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती वादात अडकली आहे.

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत महाराष्ट्र शासनाने नव्याने जारी केलेल्या परिपत्रकानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अत्यंत काटेकोरपणे अनेक वर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. पण यातील सामान्य प्रशासन विभागातील कक्ष अधिकारी अनिल जगताप यांची प्रतिनियुक्ती वादातील ठरली आहे.  जगताप हे मुख्यालयात बऱ्याच काळापासून ठाण मांडलेले त्यांची पंचायत समिती स्तरावर बदली व्हावी अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा होती. पण त्यांना सोयीचे प्राथमिक शिक्षण विभाग दिले आणि त्यानंतर लगेच माध्यमिकला प्रतिनियुक्ती मिळाली. त्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी माध्यमिकला चार कर्मचारी दिले. याला सामान्य प्रशासन विभागाने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे याप्रती नियुक्त्या स्थगित ठेवण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रति नियुक्त्या रद्द करण्यात आल्या नाहीत असे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी म्हटले आहे. इकडे कास्ट्राईब संघटनेनेही कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. बदल्याबाबत संघटनेने पत्र दिले होते पण त्याविषयी आश्वासन देऊनसुद्धा बैठक घेण्यात आली नसल्याचा आरोप कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर यांनी केला आहे.

तसेच सोशल मीडियावरून ‘सोलापूर समाचार” कडे काही कर्मचाऱ्यांनी आक्षेप नोंदवले आहेत ते पुढील प्रमाणे आहेत.

१) सचिन साळुंखे- २० वर्षापासून सा प्र वि मध्ये, इतर विभागात नियुक्ती दाखवून यापूर्वी सा प्र वि त कामकाज.
२) झहीर शेख – २० वर्षापासून ग्रामपंचायत विभागात, बदली बांधकाम विभागात असून ग्रामपंचायत विभागाकडे सेवा वर्ग.
३) प्रदीप सकट : सा प्र वि त १० वर्षापासून कार्यरत.
४) श्रीमती काशेट्टी: सा प्र वि त १० वर्षापासून कार्यरत.
५) श्रीमती कांबळे: प स बार्शी येथे बदली, सेवा वर्ग न करता सद्या सा प्र वि त काम करीत आहेत.
६) मुतवली: प स कुर्डूवाडी येथे प्रशासकीय बदली झाली असून शासन निर्णयाचे उल्लंघन करून पालकमंत्री कक्षात नियुक्ती.
७) कारंडे: प्रशासकीय बदली झाली आहे तरी सद्या अर्थ विभागात कार्यरत.
८) नागेश कुटे: १५ वर्षापासून बांधकाम विभागात कार्यरत, इतर विभागात कामकाज करून परत बांधकाम विभागात.
९) राजू शेख: माध्यमिक शिक्षण विभागात कामकाज इतर विभागात बदली झाली असून माध्यमिक शिक्षण विभागात सेवा वर्ग, यांनी आजपर्यंत दुसऱ्यां विभागात काम केले नाही.
१०) श्रीकांत धोत्रे, अनिल पाटील, रविकिरण कोरे माध्यमिक विभागात दुसऱ्यांदा काम करीत आहेत.

बदली प्रक्रियेनंतर असे आक्षेप जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावरून नोंदवले आहेत. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना विचारले असता जगताप यांच्या प्रतिनियुक्तीबाबत विचार करू व इतर कर्मचाऱ्यांची माहिती घेऊ, प्रतिनियुक्ती करण्याचे अधिकार विभाग प्रमुखांना आहेत असे स्पष्ट केले. कास्ट्राईब संघटनेने त्यांच्या काही अडचणी असतील तर समक्ष भेटून चर्चा करावी असेही स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button