सोलापूरपंढरपूर आषाढी यात्रा

पालखी मार्गावर पालकमंत्र्यांचे मिशन कोहिनकर यांनी केले यशस्वी

सोलापूर : मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रासाठी उभारण्यात आलेल्या 11 मंडप व 55 जर्मन हँगर निवारा कक्षात सात लाखांपेक्षा अधिक भाविकांनी विश्रांती घेतली आहे. ग्रामविकास व पंचायत राज विभागाने राबविलेल्या उपक्रमास वारकरी यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतील जर्मन हॅंगर मंडपात हजारो भाविकांची विश्रांतीसाठी रिघ लागली आहे.

आषाढी यात्रेच्या वेळेस दरवर्षी पालखीमार्गाच्याकडेला मिळेल त्या झाडाखाली दुपार व रस्त्याकडेला रात्रीची विश्रांती घेणाऱ्या भाविकांना यंदा मुख्यमंत्री वारकरी सुविधा कक्ष आधार बनला आहे. जिल्हा परिषदेचे सिईओ कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी विशेष लक्ष घालून हा उपक्रम तडीस नेला आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे प्रथम प्राधान्य असलेल्या या निवारा केंद्रात सात लाखापेक्षा अधिक भाविकांनी विश्रांती घेतली आहे. धर्मपुरी, कारंडेपासून ते वाखरीपर्यंत पालखी मार्गावर १ लाख स्केअर फुटासह जर्मन हॅंगर मंडप उभारण्यात आले आहेत. याला मुख्यमंत्री सहाय्यता निवारा कक्ष असे नाव दिले आहे. मंडपाचे समोर भव्य स्वागत कमानी आहेत. आत हिरवा मॅट टाकणेत आला आहे. हिरकणी कक्ष, मोबाईल चार्जींग सुविधा, चरण सेवा (फुट मसाजर ) वैद्यकीय कक्ष , बाजूसा शौचालयाचू व स्नान गृहाची सुविधा स्वतंत्र करणेत आली आहे. आज मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी बोरगाव येथे पाहणी केली.
तसेच ग्रामविकास मंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी वाखरी येथील निवारा केंद्राची पाहणी केली.
जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत 11 जलावरोधक मंडप व 55 जर्मन हँगर मंडप उभारणी चे काम करणेत आले आहे.

मोबाईल चार्जिग व एलईडी सुविधा

एकाच वेळी 200 मोबाईल चार्जिंग करण्याची सुविधा या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निवारी कक्षात करण्यात आलेली आहे. या ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आलेला असून वेगवेगळी भक्ती गीते व स्वच्छतेविषयी तसेच भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांविषयी माहिती देण्यात येत आहे. यामध्ये थेट विठ्ठल दर्शन ची लिंक देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यामुळे भाविकांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध झाल्याने वारकरी आनंदित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button