सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त रविवारी पंढरपुरात होणाऱ्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी निघालेले संतांचे पालखी सोहळे पंढरीच्या समीप येऊन पोहोचले आहेत. पंढरपूर परिसरात भक्तीचा महापूर ओसंबून वाहत आहे. वारकऱ्यांच्या सेवेत असलेल्या जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही वारीच्या सत्संगाचा मोह पडावा यात नवल ते काय? होय अगदी खरे आहे. पिराची कुरोली येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील मुक्कामी असलेले वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात दंग झालेले असतानाच तेथील व्यवस्थेच्या भेटीला आलेल्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनाही याची भुरळ पडली. क्षणभर आपण अधिकारी आहोत हेही ते विसरले. मृदुंगाच्या तालावर टाळ घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम हे या भक्तीरसात दंग झाले. ‘विठ्ठल नामाची शाळा भरली, अधिकाऱ्यांनाही भुरळ पडली” असा योग येथे जुळून आला. वारकऱ्यांच्या या आनंदात अधिकारीही सहभागी झाले. पालखी सोहळ्यात लोकप्रिय ठरलेल्या मसाज सुविधा केंद्राला भेट देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे हेही गुरुवारी रात्री येथील पालखी तळावर आले.
वारकऱ्यांसमवेत टाळ मृदुंगाचा आनंद घेताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व सीईओ कुलदीप जंगम. पहा हा व्हिडिओ…

More Stories
सोलापूरच्या महिला बचत गटाचा 30 टन कांदा गेला श्रीलंकेला
सोलापूर विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
नाईट लँडिंगची सुविधा निर्माण करून सोलापूरची विमानसेवा जोमाने सुरू ठेवण्याची पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही