सोलापूर : जिल्हा कोषागार अधिकारी म्हणून वैभव राऊत यांनी पदभार स्वीकारला आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शालेय पोषण अभियानाकडे लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले वैभव राऊत यांची पदोन्नतीवर पुणे महापालिकेकडे बदली झाली होती. तिथून पुन्हा सोलापूर जिल्हा कोषागारचे कोषागार अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. नुकताच त्यांनी पदभरती घेतला. जिल्हा कोषागार कार्यालयाकडे आर्थिक विकास महामंडळ सोडून 195 कार्यालयाचा आर्थिक कारभार येतो. त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक ग्रामीण, एसआरपी, पोलीस ट्रेनिंग सेंटर, जिल्हा न्यायालय अशा महत्त्वाच्या कार्यालयाचा समावेश होतो. या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे पगार पेन्शन व त्याचबरोबर शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा निधी जिल्हा कोषागार कार्यालयाकडे येतो. खरेदी-विक्री व इतर व्यवहारांना लागणारे स्टॅम्प जिल्हा कोषागार कार्यालयातूनच वितरित होतात. जिल्ह्यात सुमारे 36 हजार पेन्शनर आहेत. त्याचबरोबर राज्य शासनाचे 29 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. पेन्शन व वेतनापोटी दरमहा साडेचारशे कोटी जिल्हा कोषागर कार्यालयातून वितरित होतात. पुणे, कोल्हापूर नंतर सोलापूर कार्यालयाचा आर्थिक व्यवहाराचा आवाका मोठा आहे.

More Stories
सोलापूरची ६० वर्षांची प्रतीक्षा संपली; सोलापूरकरांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची भेट
जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी पुरवणी परीक्षेच्या तारखा जाहीर
सोलापूर झेडपीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुढे ढकलल्या