सोलापूरक्राईमशिक्षणसोलापूर शहर पोलीस

सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागात आले पोलीस

सोलापूर : जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागात बुधवारी पोलिस आल्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. तब्बल दीड महिन्यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्याच्या  तपासासाठी पोलिस जिल्हा परिषदेत आले होते.

याप्रकरणी माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील (राहणार जेऊर, तालुका अक्कलकोट) यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 132 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास माध्यमिक शिक्षण विभागात जाऊन पाटील यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना कामकाज करू दिले नाही व शासकीय कामात अडथळा केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सपोनी कुलकर्णी करीत आहेत.

30 जून रोजी अक्कलकोट तालुका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील हे जिल्हा परिषदेत आले होते. माध्यमिक शिक्षण विभागाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या कार्यालयात ते गेले. त्यावेळी शिक्षणाधिकारी जगताप हे कार्यालयात नव्हते. उपस्थित कर्मचारी व कामासाठी आलेल्या लोकांसमवेत त्यांनी आरडाओरडा करून शिक्षणाधिकारी फोन उचलत नाहीत, संस्थेची कामे करीत नाहीत म्हणून कार्यालय बंद करून कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. ही माहिती मिळताच शिक्षणाधिकारी जगताप तेथे आले. त्यावेळी पाटील यांनी आरडाओरडा करून त्यांना काम करू दिले नाही व त्यांच्यावर हात उचलला असा आरोप आहे. याबाबत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी जगताप यांनी कार्यालयातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासासाठी पोलिसांकडे दिले आहेत. त्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी सदर बझार पोलीस बुधवारी माध्यमिक शिक्षण विभागात आले होते. पोलिसांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी जगताप, फिर्यादी उपशिक्षणाधिकारी ढेपे व घटना घडली त्या दिवशी कार्यालयात हजर असलेल्या कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button