सोलापूरसंघटना-संस्था

मल्लिनाथ कलशेट्टी यांचे स्वच्छतेतील केलेले काम राज्याला प्रेरणादायी

सोलापूर : एक चांगले प्रशासकीय अधिकारी म्हणून डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचे स्वच्छतेत व ग्रामविकासात केलेले काम राज्याला प्रेरणादायी आहे. असे मत सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. इरेश स्वामी यांनी व्यक्त केले.
सोलापूर येथील संगमेश्वर महाविद्यालयात यशदाचे उपमहासंचालक डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी लिखित
“मी विकास यात्री’ या पुस्तकाच्या
तिसऱ्या आवृतीचे प्रकाशन माजी कुलगुरू इरेश स्वामी यांच्याहस्ते करण्यात आले. संगमेश्वर काॅलेज राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि माजी विद्यार्थी समिती, द युनिक फाऊंडेशन पुणे यांचे संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डाॅ. इरेश स्वामी हे होते.याप्रसंगी न्या. प्राची कुलकर्णी, संगमेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य ऋतुराज बुवा, माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के. डी. बोने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, द युनिक फाऊंडेशनचे विवेक घाटोळे, उप प्राचार्य सुहास पुजारी , मल्लिनाथ कलशेट्टी यांचे सुविद्य पत्नी राजश्री कलशेट्टी, प्राचार्य जमादार, प्रा . येळगावकर, प्रा. अंजुनगिकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, वळसंग चे माजी सरपंच महादेव व्हटकर, असद सैफन, कोल्हापूर हून अमित देशपांडे, द युनिक फाऊंडेशन पुणे चे केदार देशमुख प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी कुलगुरू इरेश स्वामी म्हणाले, अंतःकरणात प्रांजळता. आईने दिलेले बाळकडू कलशेट्टी यांनी जोपासले. संत तुकाराम महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे बोला तैसा चाले हा नियम त्यांनी पाळला. महात्मा बसवेश्वरांचे आचरण त्यांनी जोपासले. संगमेश्वर महाविद्यालयाच्या मुशीत तयार झाले. वळसंगमध्ये महात्मा गांधीजींनी व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली आहे. या पवित्र भूमीत एक कष्टकरी यांचा मुलगा किती प्रामाणिक असतो त्याचा प्रत्यय डां. मल्लिनाथ कलशेट्टी यांचे कार्यावरून दिसून येतो. कुमार संगमेश्वर ते जिल्हाधिकारी असा प्रवास युवकांना प्रेरणादायी आहे. त्यांनी स्वच्छतेत व सामाजिक केलेले काम राज्याला प्रेरणादायी आहे.

राष्ट्रीय सेवा योजनेतून घडलो…

यशदाचे उप महासंचालक डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, संगमेश्वर महाविद्यालय व सी बी खेडेगीज महाविद्यालय माझी कर्मभूमी राहिली. संगमेश्वर ते आयएएस होणे साठी मी जिद्द सोडली नाही. स्वच्छतेत झोकून देऊन काम केले. महिनेला दोन रूपये घरातून यायचे. गरीब परिस्थितीतून शिक्षण घेतले. प्रा. अंजुगीकर यांनी मला प्रेरणा दिली. प्राध्यापक ते उप मुख्य कार्यकारी अधिकारी व पुढे आयएएस होणे साठी मी चिकाटी सोडली नाही. दोन वेळा अपयश आले. शासनाने माझे कामाची दखल घेतली. कोल्हापूरला आयुक्त असताना 75 रविवार स्वच्छता मोहिमेसाठी दिले. माझे सोबत विकास यात्री होते. राष्ट्रीय सेवा योजनेने मला घडविले. आयुष्याला दिशा दिली असे ते म्हणाले. सुत्रसंचालन प्रा. रश्मी कन्नुरकर व प्रा. दत्तात्रय गुड्डेवाडी यांनी केले. आभार प्रा. आण्णासाहेब साखरे यांनी मानले. संगमेश्वरचे प्राध्यापक, स्टाफ यांनी या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button