संघटना-संस्थासोलापूर

कास्ष्ट्रार्ईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

सोलापूर : कास्ट्राईब जि.प. कर्मचारी संघटनेच्यावतीने संघटनेच्या कार्यालयांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर, समाजकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले, राज्य उपाध्यक्ष गिरीश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष उमाकांत राजगुरु सरचिटणीस धन्यकुमार राठोड,कल्याण श्रावस्ती, संतोष जाधव,बी के चव्हाण, योगेश काटकधोंड, देवेंद्र म्हेत्रे, दिनेश बनसोडे, नरसिंह गायकवाड,  नागनाथ धोत्रे, श्रीकांत मेहेरकर, सचिन सोनकांबळे, सुरज नदाफ, मल्लिकार्जुन तलवार, रामदास गुरव, चेतन भोसले, सावळा काळे, मकरंद बनसोडे, राजू गाडपल्ली, श्रीमती लता बनसोडे, मोरे, डांगे, अरुणा रांजणे, आदीसह संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सभागृहात प्राध्यापक एम आर कांबळे यांचे व्याख्यान झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी हे होते. शेवटी मनोज म्हेत्रे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button