सोलापूरक्राईम

मार्डीच्या यमाईदेवी मंदिरातील चोरी प्रकरणाला सहा वर्षे पूर्ण

सोलापूर ; उत्तर सोलापुरातील श्रीक्षेत्र मार्डी येथील श्री यमाई देवी मंदिरातील चोरी प्रकरणास 23 डिसेंबर रोजी तब्बल सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. पण या चोरीचा तपास लावण्यात पोलीस यंत्रणेला अपयश आले आहे.

श्री यमाई देवी मंदिरातील चोरीचा तपास लागावा म्हणून येथील भक्तानी गल्लीपासून दिल्ली र्यंतच्या आदरणीय मंत्री महोदयांपर्यंत बरेच दिवस पत्रव्यवहार केला परंतु पदरी निराशाच आली आहे . ही चोरी दि. २३ डिसेंबर २०१९ च्या मध्यरात्री झाली होती.चोरट्यांनी पुढीलप्रमाणे ऐवज चोरुन नेला.  चांदीची प्रभावळ – ११ किलो, श्रीची उत्सव मूर्ती – १:५०० किलो, चांदीची किरीट – ७ किलो, चांदीच्या दोन समई – ३ किलो, चांदीची पाठीमागील कमान – ४० किलो. चांदीचे एकूण वजन ६२:५०० किलो इतके होते. तसेच सोन्याचे पाच तोळ्याचे दागिने व अडीच लाखाची रोकड होती.

गेल्या सहा वर्षाच्या कालावधीत या चोरीचा तपास करणारे काही अधिकारी पदोन्नतीवर गेले तर काही सेवानिवृत्त झाले तर काही पोलिस अधिकाऱ्यांनी चोरीबद्दल मौन पाळले. तसेच चोरीचा तपास कुठपर्यंत आला. याबाबत पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करायला गेल्यावर मलाच त्यांनी अनेक वेळा “समजपत्रे” बजावलीत, असे देवीभक्त विष्णू जगताप यांनी सांगितले. याविषयी गावातील एकानेही पोलिस प्रशासनाकडे चोरीबाबत विचारणा केलेली नाही याबद्दल जगताप यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पोलीस अधीक्षकांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्डी येथील श्री यमाई देवी मंदिरातील चोरी प्रकरणी स्वतः लक्ष घालून, लवकरात लवकर चोरट्यांना गजाआड करुन चोरीस गेलेला ऐवाज – मुद्देमाल मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी विष्णू जगताप यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button