जिल्हा परिषदसोलापूर

पंचायतराज समितीसमोर सोलापूर झेडपीचे एकजुटीचे दर्शन

राज्यस्तरीय पुरस्कार समितीने केले कामाचे कौतुक

सोलापूर : महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्यावतीने यशवंत पंचायतराज अभियानअंतर्गत पुरस्कारासाठी राज्यस्तरीय तपासणी समितीकडून सोलापूर जिल्हा परिषदेची तपासणी करण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात सोमवारी यशवंत पंचायत राज समितीने जिल्हा परिषदेने सादर केलेल्या प्रस्तावानुसार तपासणी केली. सन 22-23 अंतर्गत सखोल तपासणी केली. रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, रायगड जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांनी सर्व प्रस्तावातील बाबींची तपासणी केली. याप्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी(प्रशासन) स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.

प्रारंभी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) स्मिता पाटील यांनी प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांचे स्वागत केले तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बडे यांचे स्वागत कार्यकारी अधियंता संतोष कुलकर्णी यांनी केले.जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांनी शासनाने दिलेले उदिष्ठ्य पुर्ण करण्याबरोबरच विविध नाविण्यपुर्ण योजना राबविण्यात आलेले आहेत. त्याचे सादरीकरण व विविध पुरस्कार प्राप्त झालेली माहिती समितीसमोर सादर करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी सादरीकरण केले. देशपातळीवर स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये उत्कृष्ठ कामगिरी करून राज्यात सोलापूर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटाकविला आहे. प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषेदेच्या सोशल मिडियाअंतर्गत कामाचे समितीने कौतुक केले. सिईओ कुलदीप जंगम व अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले , शिक्षणाधिकारी कादर शेख, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी , अधिक्षक अनिल जगताप, कक्ष अधिकारी सचिन साळुंखे, अधिक्षक स्वामी, कक्ष अधिकारी अविनाश गोडसे, कक्ष अधिकारी झेड. ए. शेख, कक्ष अधिकारी सचिन सोनकांबळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी यासाठी नियोजन करून माहिती सादर केली. सुत्रसंचालन विवेक लिंगराज यांनी केले. जिल्हा परिषदेतील सर्व कक्ष अधिकारी, अधीक्षक व कर्मचारी यांनी यासाठी मेहनत घेतली.

जिल्हा परिषदेत एकजुटीचे दर्शन

सोलापूर जिल्हा परिषदेने पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. आता राज्यस्तरीय पुरस्कारासाठी सोलापूर जिल्हा परिषदेची तपासणी करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे विविध पुरस्कारामुळे राज्यस्तरावर नाव होत आहे. ही खुप समाधानाची बाब आहे. या निमित्ताने सर्व माहिती सादर करताना सर्व विभागाची एकजुट दिसून आली असल्याचे समिती प्रमुख सत्यजित बडे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button