सोलापूरजिल्हा परिषद

आषाढीनंतर झेडपी सीईओचे नवीन मिशन; सात वर्षानंतर होणार अनुकंपा भरती

सोलापूर : आषाढी वारीच्या यशस्वी नियोजनानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आणखी एका नव्या मिशनवर काम सुरू केले आहे. सात वर्षानंतर जिल्हा परिषदेत अनुकंपा भरती होणार आहे.

आषाढीवारीच्या नियोजनात प्रत्यक्ष पंढरपुरात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा नऊ दिवस मुक्काम होता. वारी संपल्यानंतर त्यांनी लगेच नवीन मिशन मोडवर काम सुरू केले आहे. अनुकंपा भरती च फाईल त्यांनी ओपन केली आहे. त्यामुळे सुमारे सात वर्षानंतर जिल्हा परिषदेच्या ऑन ड्युटी मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसाला पुन्हा झेडपीत नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. जिल्हा परिषदेत अनुकंपाची प्रतीक्षा यादी 258 वर पोचली आहे. सेवा जेष्ठतेनुसार यातील वारसांची निवड करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी स्वतः पाहिली तपासून पाहण्यास सुरुवात केली आहे. शनिवार व रविवारच्या सुट्टीत त्यांनी निवांत ठिकाणी वेळ काढून या फायली तपासण्याचे काम केले आहे. पदभार घेतल्यानंतर त्यांनी एक टप्पा पूर्ण केला आहे. पदोन्नती, बदल्या केल्यानंतर अनुकंपा भरतीचा एक मोठा टप्पा पार होणार आहे. झेडपी कर्मचाऱ्यांच्या 20% भरती करण्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अधिकार आहेत. त्यानंतर नव्याने आता अनुकंपा भरतीचा नियम अमलात येणार आहे. त्यामध्ये ही टक्केवारी कमी होणार असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांवर वारसांना संधी दिल्यास कामाला आणखी गती येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी स्वतः याद्या तपासून कोणतीही गडबड होणार नाही याची दक्षता आतापासूनच घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच अनुकंपा भरती पारदर्शकपणे पार पडणार आहे.

अनुकंपा भरती करावयाची असल्याने सेवा जेष्ठता यादी तपासण्याचे काम सुरू केले आहे. रिक्त जागांवर वारसांना संधी दिल्यास जिल्हा परिषदेचे काम हे सुकर होणार आहे. त्यामुळे लवकरच ही मोहीम घेणार आहे.

कुलदीप जंगम, 

मुख्य कार्यकारी अधिकारी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button