सोलापूरजिल्हा परिषद

झेडपीतील फाईलला 21 दिवस झाले; करमाळ्याला बांधकाम उपाभियंता नाही

सोलापूर : करमाळा पंचायत समितीकडे बांधकाम उपअभियंता पद भरले नसल्यामुळे अनेक कामांचा कोळंबा झाला आहे. झेडपीच्या पक्षनेत्या रश्मी बागल यांनी पत्र देऊनही दखल घेतली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

करमाळा पंचायत समितीचे बांधकाम उपाभियंता सेवानिवृत्त झाले. ते सेवानिवृत्त होणार आहेत हे गृहीत धरून जिल्हा परिषद बांधकाम विभागाने नवा बांधकाम उप अभियंता नियुक्त करावा अशी फाईल प्रशासनाकडे दहा दिवस आधीच पाठवली. उपअभियंता निवृत्त होऊन 11 दिवस झाले तरीही नवीन उपअभियंता नियुक्त केला गेला नाही. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या पक्षनेत्या रश्मी बागल यांनी उपअभियंता नियुक्तीबाबत पत्र दिले आहे. तरीही या पत्राकडे दुर्लक्ष करून नियुक्ती रखडली असल्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष घातल्याचे दिसून येत नाही. आता उपअभियंता नसल्याने कामे खोळंबली तरीही याबाबत कोणाची तक्रार नाही हे येथे उल्लेखनीय. अशा प्रकारच्या अनेक फायदे रखडल्या असल्याची माहिती मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button