सोलापूरजिल्हाधिकारी कार्यालय

एस कार्तिकेएन यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतला

सोलापूर :  सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून नवीन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी 3 एप्रिल रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात पदभार स्वीकारला.

यावेळी अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, प्रांत अधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार निलेश पाटील, पंढरपूरचे तहसिलदार सचिन लंगुटे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. राज्य शासनाच्या 2 एप्रिल 2026 रोजीच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची बदली नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली तर सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांची नियुक्ती झाली आहे.

विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.यावेळी मंदिर समितीच्या वतीने नगराध्यक्षा तथा मंदिर समितीचे पदसिद्ध सदस्या प्रणिता भालके ,मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे यांनी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांचा उपरणे व श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन सत्कार केला.  यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले उपस्थित होते.कार्तिकेयन एस. हे भारतीय प्रशासकीय सेवेतील २०२० बॅच चे (आय. ए. एस.) महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. ते यापूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी पंढरपूर येथे भेट देऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, सदर कामाची माहिती कार्तिकेयन एस. यांनी घेतली. यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या व करण्यात आलेल्या कामांची माहिती यावेळी दिली.यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने नवनियुक्त जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button