सोलापूरजिल्हा परिषदबँका- पतसंस्था

सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था सभासदांना ई बाईकसाठी कर्ज देणार

सोलापूर: जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था नियमित नं 1सोलापूर या संस्थेची 92 वी वार्षिक सर्व साधारण सभा दि. 13 जून रोजी फडकुले सभागृहात चेअरमन यांचे अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

संस्थेचे मार्गदर्शनक पंडित भोसले यांचे प्रमुख उपस्थितीत सकाळी 11 वाजता रक्तदान शिबीर झाले. सभेत प्रास्ताविक चेअरमन श्वेतांबरी राऊत यांनी केले. विषय वाचन सचिव यांनी केले. विषय पत्रिकेवरील सर्व विषय सूचीनुसार ठरावास सर्वानुमते मंजुरी देण्यात आलेली आहे. यावेळी सभासदांनी काही सूचना केल्या. चेअरमन राऊत यांनी त्याची नोंद घेतली व त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे सूचित केले. सभासद यांनी सभेत अहवालाबाबत प्रश्न विचारले पाहिजेत व संचालक यांनी त्याबाबत समर्पक उत्तर देऊन शंकचे निरसन केले पाहिजे. संस्थेची प्रगती करा व विस्वस्त म्हणून काम करा असे मार्गदर्शन पंडित भोसले यांनी केले. त्यानंतर साधकबाधक चर्चा होऊन सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी ईव्ही बाईकसाठी सभासदांनी घेतलेल्या कर्जाची 50% प्ररतफेड झालेल्या सभासदांना एक लाख कर्ज देण्याचे व्हा चेअरमन कलशेट्टी यांनी सूचित केले. यावेळी सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला. ऑनलाईन लाभांश जमा करण्यात येणार आहे. रक्तदान शिबीर घेणेस सहकार्य केलेले छत्रपती शिवाजी रुग्णालय यांचे डॉ व त्यांचा स्टॉप यांचा सत्कार करणेत आला. रक्तदाते यांना प्रमाणपत्र देणेत आले

या प्रसगी संस्थेचे मार्गदर्शक दयानंद परिचरक, श्रीशैल देशमुख, नित्यानंद शिंदे व संचालक डॉ. एस. पी. माने, विष्णू पाटील, शहाजहान तांबोळी, सुरेश कुंभार, तजमूल मुत्वल्ली, शिवाजी राठोड, चेतन वाघमारे,विकास शिंदे, गजानन मारडकर, किरण लालबोन्द्रे, मृणालिनी शिंदे, विजयसिंह घेरडे,रोहित घुले,विशाल घोगरे,शिवानंद म्हमाने, डॉ. पांडुरंग नवले तज्ञ संचालक, कुंडलिक खुर्द स्वीकृत संचालक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन संचालक विष्णू पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होणेसाठी सुभाष काळे व विनोद कदम यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button