सोलापूरनिवडणूकसंघटना-संस्था

इकडे लक्ष द्या.. या सहकारी संस्थांच्या निवडणुका होणारच

सोलापूर उच्च व सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेल्या तसेच निवडणुकीच्या टप्प्यावरील असलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असे शुद्धिपत्रक राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणतर्फे काढण्यात आले आहे.

सहकारी संस्थांच्या घोषित केलेल्या निवडणुका पावसाळ्यामुळे पुढे ढकलण्यात आल्याचे परिपत्रक यापूर्वी काढण्यात आले होते. त्यामुळे अनेक सहकारी संस्थांची निवडणूक सुरू असलेली हालचाल मंदावली होती. पण राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने पुन्हा शुद्धिपत्रक जारी केले आहे.  निवडणुकीच्या टप्पा व न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू करण्याच्या प्रक्रिया सुरूच राहतील असे या शुद्धी पत्रकात नमूद करण्यात आल्यामुळे निवडणुकीच्या टप्प्यावर असलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका वेळापत्रकानुसार होणार आहेत.  त्यामुळे निवडणुका पुढे गेल्या म्हणून निवांत झालेल्यांना आता पुन्हा धावपळ करावी लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button