सोलापूरआरोग्यजिल्हा परिषद

सोलापूर झेडपी: फार्मासिस्टच्या बोगस प्रमाणपत्राची चौकशी करून कारवाई करणार

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य औषध भांडारात नियुक्ती मिळवण्यासाठी या ठिकाणी काम केल्याचे बोगस प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणात फार्मसिस्ट लीना पुजारी यांची चौकशी करून सत्यता आढळल्यास कारवाई केली जाईल असे स्पष्टीकरण शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार यांनी दिले.

गेल्या महिनाभरात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांच्या अनेक भानगडी बाहेर आल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रतापामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची मोठी बदनामी होत आहे. अपघातात जखमी झालेला तरुण उपचारासाठी पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्यानंतर तेथे कोणीही उपस्थित नव्हते. याप्रकरणी डॉ. पाटील व खटकाळे या दोन डॉक्टरांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला आहे. यात दोन कर्मचारीही दोषी आढळले आहेत. या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे. त्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांने लेखाधिकार्‍याशी डीएचओ कोपूरवाड यांच्यासमोरच गुजरात घातली. याप्रकरणीही सीईओ कुशल जैन यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. हे प्रकरणही अद्याप प्रलंबित आहे. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या जिल्हा लेखा व्यवस्थापकाची चौकशी सुरू आहे. 112 ॲम्बुलन्सवरील चालकांचे मानधन थकीत ठेवल्याची तक्रार आहे. यात ठेकेदाराला पैसे अदा झाले पण चालकांना मिळालेच नाहीत. 20 चालकांना थेट पैसे दिले जात आहेत, अशी तक्रार आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या मुख्य औषध भंडारात फार्मासिस्ट लीना पुजारी यांना विभागीय आयुक्तांकडून नियुक्ती मिळाली. येथील फार्मसीसच्या निवृत्तीनंतर अनुभवी फार्मसीस्टची नियुक्ती अपेक्षित असताना पुजारी यांनी मुख्य औषध भाडारात यापूर्वी काम केले आहे असे बोगस प्रमाणपत्र प्रशासनाकडून विभागीय आयुक्तांना देण्यात आले. याबाबत बरीच ओरड सुरू असून माध्यमांनी हा प्रश्न उचलून धरला आहे. याबाबत छावा संघटनेचे गणेश मोरे व अन्य संघटनांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. यावर चौकशीचे आदेश झाले आहेत. सध्या आषाढी वारीच्या तयारीत यंत्रणा गुंतल्याने व डीएचओ आजारामुळे रजेवर असल्याने या प्रकरणांवर पुढील कार्यवाही झालेली नाही. आषाढी यात्रा झाल्यानंतर सीईओ कुशल जैन यांच्याशी चर्चा करून यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे सभापती केदार यांनी सांगितले.

मित्रांच्या तक्रारीची ही दखल 

शिवसेनेचे नेते सिद्धाराम म्हेत्रे व माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी जिल्हा परिषदेत येऊन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्याकडे शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवकाची चार वेळा बदली करण्यात आल्याबाबत तक्रार केली आहे. मित्र पक्षांच्या सदस्यांच्या तक्रारीची आपण दखल घेतली असल्याचे सभापती केदार यांनी सांगितले. या प्रकरणात चौकशी करून दोषीवर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button