महाराष्ट्रराजकीयसोलापूर

सोलापूरच्या लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे येणारच

प्रकृती अस्वास्थ्यामुळे झाला होता दौरा रद्द

सोलापूर : प्रकृती अस्वास्थ्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळ्यासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु आगामी काही दिवसांतच सोलापूरच्या लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी ते येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी दिली.

मंगळवारी दौरा रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या शहर – जिल्हा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. सततच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्रास झाला असून डॉक्टरांनी सांगितल्यामुळे नाईलाजाने मुख्यमंत्र्यांनी सोलापूरचा दौरा रद्द केला. सोलापूरच्या लाडक्या बहिणींना न भेटता आल्याचे दुःख मुख्यमंत्री शिंदे यांना झाले आहे. परंतु काही दिवसांतच ते सोलापूरला येणार असल्याचे त्यांनी सांगितल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी कळविले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button