सोलापूरजिल्हा परिषद

मुख्यमंत्री समृद्ध गाव योजनेत सोलापूर झेडपी बाजी मारणार

सोलापूर : भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कुलदीप जंगम यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी विकासाच्या योजना राबविण्यात सोलापूर जिल्हा अग्रेसर असून आता नव्याने सुरू झालेल्या मुख्यमंत्री समृद्ध गाव योजनेतही बाजी मारेल, असा विश्वास व्यक्त केला.

प्रारंभी तिरंगा राष्ट्रध्वजास सामूहिक मानवंदना देण्यात आली. सिईओ कुलदीप जंगम यांनी जिल्हावाशीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सिईओ कुलदीप जंगम यांनी पुष्पहार अर्पण केला. अतिरिक्त सिईओ संदीप कोहिनकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी आरती ओवाळून अभिवादन केले.
सिईओ कुलदीप जंगम यांचेहस्ते ध्वजारोहण करणेत आले. हरिभाई देवकरण प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व बहारदार महाराष्ट्र गीत सादर केले. त्यानंतर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी स्वच्छ सुजल गाव संकल्प मोहिमेची शपथ दिली.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, म्हाडाचे संचालक अजयसिंह पवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुलक्षणा सोनवणे, जिल्हा कृषी अधिकारी हरिदास हावळे,उप कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरीबा सपताळे, उप शिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे, लेखाधिकारी श्रीकांत मिरगाळे उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्यावतीने सिईओ जंगम यांचेहस्ते सन्मानपत्र वाटप करणेत आले. सुत्रसंचालन विस्तार अधिकारी गुरव यांनी केले. तर प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button