सोलापूरजिल्हा परिषद

पंधराव्या वित्त आयोगाबाबत संजयमामा शिंदे यांनीही टोचले कान

जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन यांना दिले पत्र

सोलापूर : पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी वाटपावरून निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार संजयमामा विठ्ठलराव शिंदे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना पत्र लिहून कान टोचले आहेत.

*पत्रात काय मागणी?*
जिल्हा परिषद विकास आराखडा (DPDP) तयार करणे बंधनकारक असताना प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. शासन निर्णय क्र. BPDP/DPDP – २०२१ नुसार तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.

४ प्रमुख मागण्या:*
१) जिल्हा नियोजन समितीमध्ये दोन जि.प. सदस्य, सर्व पंचायत समिती सभापती, प्रत्येक तालुक्यातून एक सरपंच यांचा समावेश करून ‘जिल्हा क्षेत्रीय कार्यकारी गट’ तात्काळ स्थापन करावा.
२) विषय समितीचे सभापती व सर्व सदस्यांना पदसिद्ध सदस्य म्हणून समाविष्ट करून बैठक घ्यावी.
३) कार्यकारी गटाने विषयनिहाय अभ्यास करून प्रारूप आराखडा नियोजन समितीकडे पाठवून अंतिम DPDP सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवावा.
४) सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता DPDP आराखड्यामध्ये किमान ६० टक्के खर्च हा पाणीपुरवठा व संबंधित पाणी योजनांच्या कामांसाठी बंधनकारक करावा. ग्रामीण भागातील पाणी व चारा टंचाई गंभीर असून गावांच्या विकासासाठी हा आराखडा विनाविलंब तयार करून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पत्रात केली आहे.

पंधराव्या वित्त आयोगाचा निधी हा गावाच्या लोकसंख्येवरून ठरविला जातो. तो गावाच्या विकासासाठी वापरावा असे ठरलेले आहे. असे असताना या निधीचे नियमबाह्य पद्धतीने वाटप होत असल्याचा आरोप होत आहे.  दोन दिवसापूर्वी मोहोळचे आमदार राजू खरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे भेट घेऊन हीच मागणी लावून धरली आहे. अन्यथा विधानसभेत आवाज उठवणार असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यानंतर माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी यापूर्वीच दिलेले हे पत्र “सोलापूर समाचार’ च्या हाती लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button