सोलापूरकृषीमहाराष्ट्र

“दादा काळजी करू नका, सरकार हाय पाठीशी’: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला शेतकऱ्यांना दिलासा

राजापूर, बुरलेवाडी येथील दुष्काळ परिस्थितीची पाहणी; पिकांची स्थिती व पाणीसाठ्याचा घेतला आढावा

सांगोला : राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी सांगोला तालुक्यातील राजापूर व बुरलेवाडी येथे दुष्काळसदृश्य परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी खरीप पिकांची स्थिती आणि पाणीसाठ्याचा आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी कृषिमंत्री भरणे म्हणाले, “दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पंचनामे वस्तुनिष्ठ आणि वेळेत पूर्ण करा.” राज्यात पावसातील खंडामुळे १.४९ कोटी हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, आतापर्यंत १ कोटी हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित काम ४-५ दिवसांत पूर्ण होईल. सांगोला तालुक्यात ९५% पंचनामे पूर्ण झाले आहेत. केंद्रीय पथकाकडून पाहणी सुरू असून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांतून मदत मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार बाबासाहेब देशमुख, प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार बाळूताई भागवत, उपविभागीय कृषी अधिकारी दिपाली जाधव व शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button