सोलापूरसोलापूर शहर पोलीस
गोळीबार कौशल्यात API श्रीनाथ महाडिक नंबर वन
सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील प्रशिक्षणात उल्लेखनीय कामगिरी; पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील यांच्याहस्ते सत्कार

सोलापूर : २६/११ मुंबई हल्ल्यासारख्या आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या संकल्पनेतून राज्यभर विशेष गोळीबार प्रशिक्षण राबवले जात आहे. इस्रायल कमांडो प्रशिक्षणाच्या धर्तीवर हे प्रशिक्षण दिले जात आहे. त्याच अनुषंगाने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात आयोजित प्रशिक्षणात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक यांनी अचूक निशाणेबाजी, एकाग्रता आणि आत्मविश्वासपूर्ण कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील यांच्याहस्ते त्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.श्रीनाथ महाडिक यांच्या या यशाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कौतुक होत असून, हे यश इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.



