सोलापूरजिल्हा परिषद

सोलापूर जिल्हा परिषदेने केले पांढऱ्या टोपीचे महत्व अधोरेखित

जिल्हा परिषद सोलापूर व दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने 'अभिजात मराठी भाषा सप्ताह' उत्साहात साजरा

सोलापूर : जिल्हा परिषद सोलापूर व पंचायत समिती दक्षिण सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवार दि. ९ ऑक्टोबर रोजी ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’निमित्त ‘उत्सव अभिजात मराठीचा’ हा कार्यक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन व गट विकास अधिकारी मनोज राऊत यांच्या संकल्पनेतून उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी सर्वांनी *पांढरी टोपी* घालून परंपरागत रीती-रिवाज जपण्याचा आदर्श ठेवला. मराठी भाषेचा समृद्ध साहित्यिक व सांस्कृतिक वारसा जनमानसापर्यंत पोहोचवणे आणि मराठीविषयी अभिमान वृद्धिंगत करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.या कार्यक्रमास प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, शिक्षणाधिकारी विशाल मुळे, गट विकास अधिकारी मनोज राऊत, सहाय्यक गटविकास अधिकारी सनी चव्हाण, गट शिक्षणाधिकारी अविचल महाडीक, जयश्री सुतार व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

*BDO मनोज राऊत* यांनी मनोगतात सांगितले की, “मराठी ही हृदयाला थेट भिडणारी भाषा आहे. पांढऱ्या टोपीचे महाराष्ट्राच्या लोकजीवनात, लोककलेत आणि वारकरी परंपरेत अनन्यसाधारण महत्त्व आहे.” कार्यक्रमात कविता वाचन, हलगीवादन, भूपाळी, अभंग, वासुदेवाचे गाणे, जात्यावरची गाणी, पोवाडे, भारूड सादर करण्यात आले. जि.प. शाळा उळे येथील ओंकार पवार याने हलगीवादन केले. पत्रकार शरीफ सय्यद यांनी ‘बाप’ ही स्वरचित कविता सादर केली. सूत्रसंचालन मेहताब शेख, अपर्णा तुळजापूरकर आणि ज्योती वाघमारे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button