सोलापूरजिल्हा परिषदजिल्हाधिकारी कार्यालय

ते.. पालखी मार्गावरील जर्मन हँगर तुम्ही बघितलाय काय?

पंढरपूर ; संताच्या सर्व पालखी मार्गांवरील भाविकांना देणारे येणारे सुविधांचे  कामे अंतीम टप्प्यात आली असून राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची मंत्रालयातील टीम ग्राऊंडवर पाहणी साठी आली आहे. या टीमने पालखी मार्गावर अंतीम टप्प्यात असलेले कामाचे प्रगतीवर समाधान व्यक्त केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी प्रत्येक पालखी मार्गा साठी जबाबदार विभाग प्रमुख नेमले आहेत. तासनतास प्रत्येक बाबींचा आढावा घेऊन कामांची अंमलबजावणी केली जात आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे वतीने पाच प्रमुख पालखी मार्गावरील कामे वेगवान गतीने सुरू असतानाच अंतीम टप्प्यात असलेली कामे पाहणी करणेसाठी राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या टीमने आज संत निवृत्तीनाथ महाराज पालखी मार्ग संत एकनाथ महाराज पालखी मार्ग व निळोबाराय महाराज पालखी मार्गावरच्या मुक्कामाच्या ठिकाणी तसेच विश्रांतीच्या ठिकाणी भाविकांच्या सुविधांची पाहणी केली बिटरगाव व रावगाव येथील वेगवेगळ्या सुविधांच्या पाणी बरोबरच ग्रामविकास विभागाने मंजूर केलेल्या रस्त्याची कामे सुरू असून या कामांची देखील पाहणी विशेष कार्यकारी अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केली.

रावगाव ता. करमाळा येथील संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी तळावरील रस्त्याचे कामांची पाहणी टीम ने करून समाधान व्यक्त केले. स्वतः पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखी मार्गावर चार दौरे केले असतानाच कामाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी विशेष कार्यकारी अधिकारी दादासाहेब कांबळे , विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी दोन्ही पालखी मार्ग पिंजून काढून धावता दौरा केला. त्यांचे समवेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर , जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव , गटविकास अधिकारी सुशील संसारे , करमाळा गटविकास अधिकारी डाॅ. अमित कदम व इतर अधिकारी उपस्थित होते. भाविकांच्या निवास व्सवस्थेची पाहणी , शौचालय व स्नानगृह तसेच ग्रामविकास विभागातून मंजूर केलेल्या रस्त्याच्या कामांची पाहणी केली. प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे यांनी तीनही पालखी मार्गावरील सर्व कामांची माहिती टीम ला दिली.

तीन पालखी तळाची पाहणी

जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी खडूस येथील उभे रिंगण तसेच पिराची कुरुल येथील पालखीतळ तसेच भंडी शेगाव येथील पालखीतळाची पाहणी करून विविध सुविधांची पाहणी केली महिलांसाठी असलेला हिरकणी कक्ष तसेच महिला साठी स्नानगृहाची व्यवस्था व इतर कामांची पाणी आज उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी करून त्यांनी पुढील सूचना दिल्या

जर्मन हॅंगर निवास 

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर भंडी शेगाव येथील पालखीतळावर जर्मन हँगर चे काम अंतिम टप्प्यात आले असून या ठिकाणी 5000 पेक्षा अधिक भाविकांची निवासाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे या ठिकाणी मोबाईल चार्जिंग च्या सुविधा सह महिलांसाठी पुरुषांसाठी शौचालय तसेच हिरकणी कक्षाची देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button