सोलापूरकृषीजिल्हाधिकारी कार्यालय

पी एम किसान व नमो शेतकरी योजनेस कोण अपात्र आहेत हे माहित आहे का?

सोलापूर : पी. एम. किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत याची बऱ्याच जणांना माहिती नाही. सरकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी व दहा हजार पेक्षा जास्त पेन्शन घेणारे या योजनेस पात्र नाहीत तसेच एकाच कुटुंबातील फक्त एकालाच या योजनेचा लाभ घेता येतो.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 पासून केंद्र शासनाने देशभरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही नोव्हेंबर 2023 पासून महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना असून या दोन्ही योजनांचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा.

प्रधानमंत्री किसान सन्मान •योजनेचे स्वरुप

पी एम किसान योजना देशभरातील जमीनधारक शेतकऱ्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली या योजनेतंर्गत थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात तीन समान हप्त्यामध्ये प्रति वर्ष 6 हजार रुपये हस्तांतरीत केले जातात.

लाभ मिळण्यासाठी पात्रता.. 

1) कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ देय राहील. (पती, पत्नी किंवा 18 वर्षा खालील मुलास लाभ मिळत असल्यास कुटुंबातील इतर सदस्यास लाभ मिळणार नाही.)

2) लाभार्थ्यांच्या नावे जमीन असणे आवश्यक. (फेरफार फेब्रुवारी 2019 च्या पूर्वीचा असावा), अपवाद मयत शेतकऱ्याकडून वारसा हक्काने जमीनीचे हस्तांतरण झाल्यास लाभ देय).

अर्ज कोठे कराल…

केंद्र शासनाच्या पी एम किसान पोर्टलवर स्वयं नोंदणी करणे. सामुहिक सुविधा केंद्र (CSC) मार्फत पोर्टलवर नोंदणी. पी एम किसान योजने अंतर्गत नोंदणीकृत लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी खालील आवश्यक बाबी. 1) भूमि अभिलेखेप्रमाणीकरण (महसूल विभागामार्फत),2) आधार प्रमाणीकरण, 3) e-KYC प्रमाणीकरण.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धरतीवर महाराष्ट्र शासनाने राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नोहेंबर 2023 पासून सुरू केलेली आहे.

2.या योजनेत पात्रतेच्या अटी व शर्ती पी एम किसान योजनेप्रमाणेच असून जे साभाली पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळेल.

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजने अंतर्गत फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीएम सन्मान निधी योजना व नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button