February 21, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

आरोग्याच्या वारीसाठी सोलापूर झेडपीचे हायटेक नियोजन

सोलापूर : आषाढी वारीचा सोहळा समीप येत चालला असून संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर आले आहेत. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून वारकऱ्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी हायटेक नियोजन केले आहे आषाढी वारीत यंदा प्रथमच डॉक्टरांची सुविधा वेळेवर पोहोचण्यासाठी वाकीटॉकीचा वापर करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा आषाढी वारी सोहळ्याचा हा पहिलाच अनुभव आहे गतवर्षीच्या आषाढी वारी सोहळ्याच्या नियोजनाचा अभ्यास करून सीईओ जंगम यांनी जिल्हा परिषदेच्या कामाचे हायटेक नियोजन केले आहे वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी दुपटीने यंत्रणा उभी करण्यात आली आहे पालखी मार्गावर गर्दी झाल्यानंतर मोबाईल ची सेवा काही वेळा ठप्प पडते आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य सेवा व्यवस्थितपणे काम करण्यासाठी सीईओ जंगम यांनी यावेळेस प्रथमच डॉक्टरांना संपर्क करण्यासाठी वाकी टॉकीचा प्रयोग केला आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून आरोग्य विभागामार्फत 30 वॉकी टॉकी खरेदी करण्यात आले आहेत यातील 14 वाकी टाकी पंढरपूर ग्रामीण रुग्णालय तर बारा वाकी टाकी माळशिरस आरोग्य केंद्राकडे सोपीविण्यात आले आहेत पंढरपूर ते कारंडे यादरम्यान पालखी सोहळ्यात डॉक्टरांना सुलभरीत्या सेवा देण्यासाठी या हायटेक यंत्रणेचा वापर केला जाणार आहे यातील चार वाकी टॉकी अधिकाऱ्यांकडे असणार आहेत गर्दीतही वेळेवर आरोग्य सुविधा देण्यासाठी डॉक्टरांना एकमेकांना समन्वय साधने यातून सुलभ होणार आहे स्वयंचलित या वाक्य-टॉकीचे सुमारे दोन किलोमीटर रेंज असणार आहे चॅनलच्या माध्यमातून डॉक्टर अधिकारी व आरोग्य सेवकांचा संपर्क राहणार आहे.

वारकऱ्यांसाठी फूट मसाजर

याचबरोबर पालखी सोहळ्यांबरोबर चालून थकलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी फूट मसाजरचे पथक कार्यरत असणार आहे. सीईओ जंगम यांनी ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर अमलात आणली आहे. 30 जून ते सहा जुलै दरम्यान या पथकाकडून वारकऱ्यांची सेवा केली जाणार आहे. पालखी सोहळ्याचा मुक्काम असेल त्या ठिकाणी सायंकाळी सहा ते रात्री अकरा यादरम्यान हे पथक वारकऱ्यांची फूट मसाजरद्वारे सेवा करेल. प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी स्वतः पालखी मार्गावर फेरफटका मारून सर्व पथकांना फूटमसाजर मशीनचे वाटप केले व कर्मचाऱ्यांना वारकऱ्यांची सेवा योग्य प्रकारे करण्याच्या सूचना केल्या.

ग्रामविकास मंत्री गोरे यांनी केली पाहणी 

राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वेळापूर येथील पालखी तळाची पाहणी केली. जर्मन हॅंगर मंडपासह, मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, हिरकणी कक्ष यांची पाहणी केली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचेसमवेत माजी आमदार राम सातपुते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, पालकमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव उपस्थित होते.

शेगावच्या राणाचे स्वागत

शेगावच्या संत गजानान महाराज पालखी सोहळ्याचे शनिवारी सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे जिल्ह्याच्या हद्दीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सुविद्य पत्नी डाॅ. तेजस्वीनी जंगम यांचेसमवेत संत गजाजन महाराज यांचे पादुकांचे दर्शन घेतले. त्यांनंतर श्रीफळ देऊन विणेकरी यांचे स्वागत करून अश्वाचे पूजन केले. याप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, अप्पर पोलिस अधिक्षक प्रीतम यावलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले, समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे,गटविकास अधिकारी शंकर कवितके, तालुका वैद्यकीय अधिकारी निलम घोगरे, वैद्यकीय अधिकारी संतोष कुमार, उळेच्या सरपंच अंबिका कोळी, कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर, उपस्थित होते. जिल्हा परिषद प्रशासनाने उळे येथे कमी असलेल्या वारकऱ्यांसाठी शौचालय व्यवस्था, स्नानगृह, मसाज चरण सेवा, प्लास्टिक सेवन केंद्र, आरोग्य केंद्र , वारकरी निवारा केंद्राची व्यवस्था करणेत आली आहे. फुलांचा वर्षाव करीत पालखी सोहळ्यातील भाविकांचे स्वागत करणेत आले. त्यानंतर रविवार सकाळी गजानन महाराज पालखीचे सोलापूर शहरात आगमन झाले. दुपारी सम्राट चौकात प्रभाकर स्वामी महाराज पालखीचा सोहळा पार पडला. त्यानंतर कुचन प्रशालेत पालखी सोहळ्याचा मुक्काम झाला. सोमवारी सकाळी पालखीचे सात रस्ता चौकाकडे प्रयाण होणार आहे. उपलब्ध मंगल कार्यालयात पालखीचा मुक्काम असणार आहे.

बालदिंडीत सहभाग
पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी बालदिंडीत सहभाग घेऊन मुलांना शुभेच्छा दिल्या. सिईओ जंगम यांचे सहभागाने मुलांचा आनंद द्विगुणीत झाला. या प्रसंगी गट विकास अधिकारी सुशील संसारे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेणूनगर गुरसाळे येथील बाल दिंडीत सहभाग नोंदविला व बालकांचा उत्साह वाढविला. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी सावता शिंदे, उपसरपंच बाळासाहेब लेंगरे ग्रामपंचायत उपस्थित होते.