March 10, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत सोलापूरच्या खेळाडूंचे यश

  • सोलापूर: पंचवीसावी सब ज्युनिअर राज्यस्तरीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा दि. ६ ते ८ ऑक्टोबर रोजी परळी वैद्यनाथ (बीड) येथे पार पडली. या स्पर्धेत वैयक्तिक ईपी प्रकारात रुद्र सरडे ह्याला कांस्यपदक व सांघिक प्रकारात पृथ्वीराज घाडगे व रुद्र सरडे या दोघांना सुवर्ण पदक मुलींच्या फॉईल सांघिक प्रकारात गौरी पाटील व नक्षत्रा कोंगारी यांना रौप्य पदक व मुलांच्या फॉईल सांघिक प्रकारात श्रेयस पेंटर ह्याने कांस्यपदक मिळविले.या यशाबद्दल इंडियन मॉडेल स्कूलचे सचिव अमोल जोशी, महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे मार्गदर्शक, छत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे, महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे सचिव डॉ उदय डोंगरे, उपाध्यक्ष प्रा. प्रकाश काटूळे, क्रीडासंघटक राजेंद्र माने,जिल्हा सचिव दीपक शिंदे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छ्या दिल्या.या खेळाडूंना एनआयएस कोच क्रीडा शिक्षक अक्षय माने व आकाश लाटणे यांचे मार्गदर्शन लाभले.