सोलापूरसोलापूर शहर पोलीस

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याहस्ते राष्ट्रपती पदक विजेते एसीपी मनोजकुमार यादव यांच्यासह मान्यवरांचा सन्मान

सोलापूर : भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडला. यावेळी जिल्हा प्रशासनातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पोलीस विभाग : उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवा पुरस्कार

पोलीस दलातील उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवेबद्दल खालील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. सहाय्यक पोलीस आयुक्त मनोजकुमार माधवराव यादव, विलास हनुमंत इंगळे, विजयालक्ष्मी सिद्राम कुरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे, पोलीस उप-निरीक्षक दत्तात्रय भिमराव काळे, पोलीस हवालदार नागेश अप्पासाहेब येणपे /556, विनायक विष्णु भानवसे /34, प्रकाश दत्तात्रय निकम /271, अभिजीत सदाशिव कोष्टी /12, महिला पोलीस हवालदार पुनम रामचंद्र डांगे, पोलीस हवालदार रविंद्र किसनराव खजुरे, पोलीस कॉन्स्टेबल इब्राहिम निजाम शेख /1517, रमेश बाबुराव कोगाव /1489, रामेश्वर वैजिनाथ साखरे /1624, वसीग इसाक शेख /1602, हेमंत हनुमंत वाघमारे /1500, सिद्राम गुलाब देशमुख /1466, विशाल वैजिनाथ बोराडे /305, आनंद प्रकाश गडदुरे /1577, संतोष संभाजी वाघमारे /1671, नितीन दत्तात्रय मोरे यांचा समावेश आहे.

क्रीडा क्षेत्रातील विशेष मान

दक्षिण आफ्रिकेतील डर्बन ते पीटर मेरीटझबर्ग या दोन शहरांदरम्यान झालेल्या कॉमरेड मॅरेथॉन 2026 स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातून प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि पोलीस शिपाई हेमंत वाघमारे /1501 यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

पोलीस विभाग 

अतिउत्कृष्ट सेवा पदक सहाय्यक फौजदार पुरुषोत्तम ताटे यांना प्रदान करण्यात आले. तसेच उत्कृष्ट सेवा पदक सपोनि अनिल गुरुबसप्पा सनगल्ले, सपोनि सोमनाथ जयवंत कदम, पोह दशरथ अर्जुन गोरे, पोह अमृत रोहिदास खेडकर, सपोनि पोपट बबन टिळेकर, फौजदार सागर निवृत्ती पाटील, महिला फौजदार स्नेहल विलास चव्हाण, फौजदार प्रतापसिंह किसन जाधव, निलेश एकनाथ गायकवाड,  रविराज सायबण्णा कांबळे यांना प्रदान करण्यात आले.

शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत प्राविण्य मिळविलेल्या सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्यामध्ये इयत्ता 4 थी जि.प.प्रा.शा. तेंडूलकर वस्ती शेवरे ता. माढा येथील जैद जहांगीर तांबोळी, इयत्ता 5 वी जि.प.प्रा.शा. चिंचोली ता. माढा येथील ओम गणेश देवकर, इयत्ता 7 वी उच्च प्राथमिक सांगोला विद्यामंदिर व ज्यु. कॉलेज ता. सांगोला येथील अर्णव चतुरगुण औताडे, इयत्ता 8 वी पूर्व माध्यमिक इंग्लिश स्कूल म्हेत्रे मंगळवेढा येथील जान्हवी गणेश भोसले यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button