सोलापूरआरोग्यजिल्हा परिषद

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मरवडे आरोग्य केंद्रातील लोकांशी साधला संवाद

सोलापूर: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून जन आरोग्य समितीचा जनसंवाद कार्यक्रम ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र, मरवडे येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी जन आरोग्य समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

बैठकीदरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी उपस्थित लोकांशी संवाद साधला. उपस्थित सदस्यांनी परिसरातील विविध आरोग्यविषयक समस्या व अडचणी मांडल्या. लोकांमधून आलेल्या समस्यांवर आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले.

यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, मरवडे येथील इमारतीची पाहणी केली. तसेच कार्यालयीन दप्तर व नोंदी व्यवस्थित ठेवण्यात आल्याबद्दल त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.या कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भाऊसाहेब जानकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जी. शिंदे, डॉ. नंदकुमार शिंदे, पंचायत समिती सदस्य मोहिनी श्रीकांत गणपाटील, सरपंच मिनाक्षी सिद्धेश्वर सूर्यवंशी (मरवडे), सरपंच श्रीकांत दवले (भालेवाडी), सरपंच सरूबाई लांडगे (डिकसळ), सरपंच पल्लवी शिंदे (फटेवाडी), माजी सरपंच रजाक मुजावर, माजी विस्तार अधिकारी माणिक पवार, सुभाष शिवशरण, पांडुरंग जाधव,  विठ्ठल पाटील, श्रीकांत लवटे तसेच हरिदास जाधव यांची उपस्थिती होती. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी व आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button