सोलापूरन्यायालयमहाराष्ट्र

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक

मुंबई : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणूक 2026 चा निकाल जाहीर झाला असून सोलापूरचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांनी दणदणीत विजय मिळवत हॅट्रिक साधली आहे. पहिल्या पसंतीची ३८२९ मते मिळवत ते राज्यातील पाचव्या क्रमांकाने विजयी ठरले आहेत.

बार कौन्सिलच्या 23 सदस्यांच्या निवडीसाठी झालेल्या या निवडणुकीत राज्यभरातील सुमारे एक लाख वकिलांनी मतदान केले होते. 155 उमेदवारांमधून निवड झालेल्या विजेत्यांमध्ये ॲड. थोबडे यांनी आपले स्थान कायम राखले.

यापूर्वी 2010 आणि 2019 च्या निवडणुकांमध्येही त्यांनी उल्लेखनीय विजय मिळवला होता. तसेच त्यांनी 2011 आणि 2022 मध्ये बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा अध्यक्षपदही भूषविले आहे. सोलापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि सचिव राहिलेल्या ॲड. थोबडे यांनी आपल्या कार्यकाळात वकिलांसाठी विमा व मेडिक्लेम योजना, नवोदित वकिलांना लॅपटॉप व कायदेविषयक पुस्तके, महिला मेळावे, राज्यस्तरीय कार्यशाळा, क्रिकेट स्पर्धा तसेच गरजू वकिलांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य यांसारखे अनेक उपक्रम राबविले.विजयानंतर ॲड. मिलिंद थोबडे यांनी सर्व वकिलांचे आभार मानत वकील संरक्षण कायदा मंजूर व्हावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. तसेच नवोदित वकिलांना सक्षम बनविणे आणि वकिलांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील, अशी ग्वाही दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button