सोलापूरजिल्हा परिषद

कामती, बुद्रुकवाडी ग्रामपंचातीची झाली तपासणी

सोलापूर : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत विभागीय स्तर तपासणी करण्यात आली मोहोळ तालुक्यातील कामठी खुर्द व माढा तालुक्यातील बुद्रुकवाडी या ग्रामपंचायतीची पाहणी करण्यात आली

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील अपर आयुक्त (विकास) दिपाली देशपांडे, सहायक आयुक्त (विकास) रविंद्र कणसे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अभियंता प्रविण पाटील, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, सहाय्यक गटविकास अधिकारी विजयकुमार देशमुख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सहायक प्रशासन अधिकारी शैलेश सराफ, कनिष्ठ सहायक विशाल भुरकुंडे, सरपंच सविता किरण माळी, उपसरपंच दीपक काटकर, जिल्हा प्रशिक्षण समन्वयक शंकर बंडगर, महादेव शिंदे , इंजिनियर योगेश कुंभार, विस्तार अधिकारी नागसेन कांबळे, ठक्का, समूह समन्वयक प्रशांत शिंदे उपस्थित होते .

ग्रामपंचायत अधिकारी मंजुश्री कारंडे यांनी प्रेझेंटेशनद्वारे गावात राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. प्रास्तविक सोलापूर दूध संघाचे व्हाईस चेअरमन दीपक माळी यांनी केले. कामती बुद्रुक व बुद्रुकवाडी येथील शाळा, अंगणवाडीस भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ग्रामपंचायतीमध्ये फिरून पाहणी केली. शाळा, स्वच्छतागृह, वैयक्तिक स्वच्छतागृह, सार्वजनिक स्वच्छतागृह, परसबाग, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, महिला बचत गटांनी केलेली विविध उपक्रम, मासिक पाळी व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीने राबविलेले उपक्रम या कामांची पाहणी अपर आयुक्त दिपाली देशपांडे यांनी केली. सर्व अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी सर्व ग्रामपंचायत सदस्य शिक्षक यांच्या सहकाऱ्यांने विभागीय तपासणीची कार्यवाही पार पाडली.

महिलांच्या आरोग्यासाठी लक्ष द्या

कामती गावात महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन वाटप, माझी वसुंधराअंतर्गत राबविलेले विविध उपक्रमाचे कौतुक अपर आयुक्त दिपाली देशपांडे यांनी केले. महिलासाठी सार्वजनिक ठिकाणी सॅनिटरी नॅपकीनसाठी व्हेडींग मशीन बसविण्याच्या सुचना केल्या. पाणी गुणवत्तेसाठी काळजी घेणेचे सुचना दिल्या. महिलांचे आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष द्या असेही त्यांनी सांगून स्पर्धा परीक्षेसाठी गावातील युवकांना प्रोत्साहन देणेसाठी अद्यावत लायब्ररी करा, अशा सुचना अपर आयुक्त देशपांडे यांनी दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button