सोलापूरहवामान

सोलापुरात रात्र पावसाची; अनेक रस्ते पाण्याखाली

सोलापूर : सोलापुरात बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी आले आहे. जिल्ह्यात सर्व दूर पावसाने हजेरी लावली असून खरीपाची पिके पाण्याखाली गेली आहेत.

सोलापूर जिल्ह्याला बुधवारी रात्री पावसाने झोडपले. ग्रामीण भागात रात्री दहा वाजता पावसात सुरुवात झाली. बुधवारी दिवसभर ग्रामीण भागात उन्हाचा कडाका जाणवला. खरेतर ऑक्टोबरमध्ये अशी हिट जाणवते. पण यंदा मेच्यामध्ये पावसाळ्याला सुरुवात झाली. त्याप्रमाणे सर्वच गणित बिघडले आहे. ऑक्टोबर ऐवजी सप्टेंबरमध्ये हिटचा कडाका जाणवला. हवामान वेधशाळेने दिलेल्या अंदाजाप्रमाणे बुधवारी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. गेले आठवडाभर पाऊस नसल्याने चिखलाने माखलेले रस्ते मोकळे झाले होते. आता कुठे हरवलेली वाट सापडलेले असतानाच पुन्हा पावसाने झोडपल्यामुळे रस्ते पाण्यात वाहून गेले आहेत. सोयाबीन व उडीदाची काढणी सुरू असतानाच पावसाने झोडपल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच भरपूर पाऊस झाल्यामुळे उडीद पाण्यात आहे. त्यामुळे प्रत खराब झाल्यामुळे व्यापाऱ्यानी भाव डाउन केले आहेत. काढणीला मजुरीची हजेरी 500 तर मळणीला पाकीटला 400 रुपये घेतले जात आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांना काढणीचा खर्चही हाती लागला नाही. अशात पुन्हा पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सोलापूर शहरात बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला. साखर झोपेत असणाऱ्या नागरिकांना या पावसाची कल्पना आली नाही. सकाळी उठल्यावर अनेक रस्ते पाण्याखाली दिसले. विडी घरकुल मधील शहराला जोडणारा रस्त्यावर नाल्याचे पाणी आले. मनपाचे आपत्कालीन कर्मचारी व पोलिसांनी खबरदारी म्हणून या रस्त्यावर धाव घेतली. कुंभारी ते साखर कारखाना या आपत्कालीन रस्त्याच्या मार्गावरील नाल्याचा पूल पाण्याखाली गेला. हे सर्व नाले येऊन मिळणाऱ्या देगाव परिसरात तलावाचे स्वरूप आले आहे. दक्षिण, उत्तर सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट तालुक्यातही जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. यामुळे अनेक तलाव भरून वाहू लागले आहेत.

हैदराबादरोड विडी घरकुल भाग…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button