सोलापूरजिल्हा परिषद

सोलापूर झेडपीची बचत गटाच्या महिलांना रक्षाबंधनाची मोठी भेट

सोलापूर : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिलांनी वेगवेगळे व्यवसाय करून लखपती होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले.

ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधनचे निमित्ताने राज्यातील महिलांना वेगवेगळे व्यवसाय करण्यासाठी राज्यात 300 कोटी समुदाय निधी वितरण करण्यात आला. यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर,उत्तर सोलापूर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी पाटील, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, लेखाधिकारी शुभांगी देशपांडे,जिल्हा व्यवस्थापक राहुल जाधव, अनिता माने, संतोष डोंबे, दयानंद सरवळे, शितल म्हंता, पूनम दुध्याळ, शिवाजी वाघमारे, सादिक शेख, दिगंबर साळुंखे, चंद्रकला कणकी, पोपट चौधरी उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यात आज उमेद अभियान अंतर्गत 14 कोटी रुपये एका क्लिकवर वाटप करण्यात आले असून त्या निधीतून महिलांनी वेगवेगळे व्यवसाय उभे करून आर्थिक सक्षम होवून लखपती दिदी व्हावे. महिलानी नावीन्यपूर्ण व्यवसाय करून आपली वेगळी ओळख निर्माण करावी व स्वतःचा, कुटुंबाचा विकास करावा असे आवाहन कुलदीप जंगम यांनी केले.

या कार्यक्रमासाठी उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यांतील बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद चिंचुरे यांनी तर आभार प्रदर्शन राहूल जाधव यांनी केले.

उमेदमधुन मिळालेल्या निधीतून महिलांनी वेगवेगळे व्यवसाय करावेत. लखपती दिदी होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी मार्केट मिळण्यासाठी भविष्यात उमेद मॉल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांच्या व्यवसायात वाढ होण्यास मदत होणार आहे.

संदिप कोहिनकर

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद सोलापूर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button