सोलापूरसंघटना-संस्थासामाजिक

मंद्रूपच्या युवकांनी “अशी’ साजरी केली धुळवड

विधायक कृतिशीलता; स्मशानभूमीची केली स्वच्छता

सोलापूर : धुळवडीच्या निमित्ताने मंद्रूप येथील हिंदू स्मशानभूमीची स्वच्छता करून युवकांनी विधायक कृतिशीलता जपली.

मागील ४ वर्षांपासून धुळवळीच्या निमित्ताने स्मशानभूमी स्वच्छता अभियान राबविण्यात येते. या उपक्रमात ‘आम्ही मंद्रूपकर’ उपक्रमातील युवक स्वयस्फूर्तीने सहभाग घेतात. दहनशेडमधील राख झाडांना घालून परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला. काटेरी झाडी-झुडपांनी वेढलेली बसस्थानक परिसरातील हिंदू स्मशानभूमी काही तासांमध्ये स्वच्छ झाली.

रविवारी सकाळी ६:३० वाजता स्वच्छता मोहिमेस सुरवात झाली. तरुणांनी हातामध्ये खराटा घेऊन स्मशानभूमी स्वच्छ करण्यास सुरवात केली. काहींनी काटेरी झुडपं तोडायला सुरु केले. ग्रामपंचायत कर्मचारी रवी वाडकर यांनी मोहिमेत सहभाग घेतला. तासाभरात २० ते २५ युवक जोडले गेले. स्वच्छता विभागाचे कर्मचाऱ्यांनी सहभागी झाले. जेसीबीच्या साह्याने दहनभूमी शेडच्या मागील मोठी काटेरी झाडे मुळापासून काढण्यात आली.रवी केवटे यांनी स्वच्छता मोहिमेसाठी शेत-शिवारातुन तुरीच्या काड्या गोळा करून स्वत: खराटे तयार केले. रवी हेसे, विकास शिळळे यांनी साचलेली राख झाडांभोवती टाकून शेडची स्वच्छता केली. विनोद कामतकर यांनी दहन शेडची स्वच्छता केली.

परिसर झाडून स्वच्छ केला. रवी केवटे यांनी अंत्यस्कारासाठी वापरलेले बांबूचा झाडांना आधार दिला. श्याम गोसावी, सचिन साठे, जगन्नाथ खरात यांनी स्मशाभूमीतील कचरा, इतर अनावश्यक वस्तू जाळून परिसर स्वच्छ केला. नितीन खराडे, मुकेश खराडे, उमेश देवीदास, शीतल माने, रवी हेसे, नागेश कोळी, सचिन साठे, रवी केवटे, जगन्नाथ खरात, विनोद कामतकर, रवी वाडकर, विनोद कामतकर, विकास शिल्ले, ओंकार झेंडेकर यांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला. या स्वच्छता मोहिमेत अवघ्या सात वर्षांचा रितुल गोसावी व दहा वर्षांची तनुजा केवटे या चिमुकल्यांनी खराटा हाती घेऊन स्मशानभूमीची स्वच्छता केली.

गावही स्वच्छ होऊ शकते

धुळवड निमित्ताने स्मशानभूमी स्वच्छ करण्याची संकल्पना रानवेध फाउंडेशनने मांडली. ‘आम्ही मंद्रूपकर’ म्हणून त्यास प्रतिसाद दिला. एकजुटीतून स्मशाभूमीही स्वच्छ झाली असून संपूर्ण गावही स्वच्छ होऊ शकते, हा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

श्याम गोसावी, युवक,

एकजुटीने विधायक काम

वातील युवकांनी एकजुटीने धुळवडीला स्मशाभूमीची स्वच्छता केली. ही विधायक उपक्रमाची सुरवात असून भविष्यात आणखी लोकसहभागातून विधायक उपक्रम राबवण्यात येतील.

ओंकार झेंडेकर, युवक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button