सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

अभिनंदन..! सोलापूर झेडपीचे 11 गुरुजी झाले विस्ताराधिकारी

सीईओ कुलदीप जंगम यांनी दिलेला शब्द केला खरा

सोलापूर  : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी शिक्षकांना दिलेला शब्द खरा केला आहे. मंगळवारी सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील अकरा शिक्षकांना त्यांनी विस्तार अधिकारीपदी पदोन्नती देत नियुक्त्या दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाच्या पदोन्नत्या यापूर्वीच पार पाडण्यात आल्या आहेत फक्त प्राथमिक शिक्षण विभाग अपवाद होता. पदोन्नतीच्या यादीमध्ये सेवा ज्येष्ठतेनुसार प्राधान्य देण्यावरून शिक्षक संघटनांमध्ये एकमत न झाल्याने परीक्षा नंतर पदोन्नती दिली जाईल असा शब्द सीईओ कुलदीप जंगम यांनी केला होता. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या परीक्षा आता अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे सीईओ कुलदीप जंगम यांनी मंगळवारी विस्तार अधिकारी पदाच्या पदोन्नतीची फाईल हातात घेतली. यात 11 शिक्षकांना पदोन्नतीवर रिक्त जागांवर विस्तार अधिकारीपदी  नियुक्त्या देण्यात आल्याने शिक्षक संघटनानी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी प्रशासन विभागाच्या उप  मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, उपशिक्षणाधिकारी भावसार, शिक्षण व प्रशासन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सीईओनी दिलेला शब्द खरा केल्याचे शिक्षक संघटनेचे म.ज. मोरे यांनी म्हटले आहे. मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी 25 एप्रिल रोजी कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. साधारणपणे 70 शिक्षकांना मुख्याध्यापक होण्याची संधी मिळणार आहे.

पदोन्नती झालेल्या शिक्षकांची नावे व नवीन नियुक्तीचे ठिकाण  पुढीलप्रमाणे आहे. बापूराव चव्हाण, करजगी. रामजी पवार, भंडीशेगाव, अमृता कुलकर्णी, मंगळवेढा, मंजू विठ्ठल यादव, मुख्यालय, उज्वला नकाते, पिलीव, वर्षा तडकलकर, होटगी, आयुब कलबुर्गी, मंद्रूप, अतुल माने, कुरुल, लकव्वा पुजारी, लक्ष्मी दहिवडी, लहू पांडुरंग कांबळे, महूद.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button