सोलापूरजिल्हा परिषद

बार्शीतील परीक्षा केंद्रांना सीईओ जंगम यांनी दिल्या भेटी

सोलापूर : बारावीच्या परीक्षा केंद्रांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अचानक भेटी देऊन पाहणी केली.

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या पुणे बोर्डतर्फे सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. दक्षता समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सचिव माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांच्यामार्फत कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची निगराणी आहे. सीईओ कुलदीप जंगम यांनी बार्शी तालुक्यातील चार परीक्षा केंद्रांना अचानकपणे भेट दिली. परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही सुरू आहेत का? परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडत आहेत का? याची त्यांनी पाहणी केली. परीक्षा केंद्रात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीमुळे सोलापूर जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान यशस्वी होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

उपसंचालक मोरे यांनी केले कौतुक…

पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक मोरे मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांनी सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागामार्फत राबविलेल्या कॉपीमुक्त अभियानाची पाहणी केली. परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्हीमुळे अभियान यशस्वी होत असल्याबद्दल उपसंचालक मोरे यांनीही समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button